प्रेमाची उंच भरारी:ज्या हेलिकॉप्टरमध्ये शिकला, त्यासमोरच प्रपोज

0
orig_new-project-2026-06-03t092842850_1780459629.jpg




हे दृश्य नाशिकजवळ असलेल्या ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’मधील आहे. मंगळवारी येथे पासिंग-आऊट परेड पार पडली. पायलट ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आणि जीवनातील सर्वात मोठे व्यावसायिक स्वप्न पूर्ण केल्यानंतर लगेचच, कॅप्टन भरत भारद्वाज यांनी एका गुडघ्यावर बसून आपली गर्लफ्रेंड आरुषीला ‘विल यू मॅरी मी’ (माझ्याशी लग्न करशील का) असे विचारले. आरुषीने होकार देताच त्यांनी तिला अंगठी घातली. भरत यांनी या संस्मरणीय क्षणासाठी त्याच हेलिकॉप्टरची निवड केली, ज्यामधून त्यांनी स्वतःचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. भरत यांच्या सांगण्यानुसार, ते आरुषीला पाच वर्षांपासून ओळखतात आणि हा दिवस कायमचा संस्मरणीय बनवू इच्छित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *