सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू:मच्छीमार युवकांना 6 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण, आधुनिक मासेमारी तंत्रज्ञानाचे मिळणार मार्गदर्शन

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-06-03t144621885_1780478262.jpg




राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास आणि विस्तार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन’ या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 136 व्या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असून इच्छुक मच्छीमार युवकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये नौकानयनाची मूलतत्त्वे, सागरी डिझेल इंजिनच्या विविध भागांची माहिती, देखभाल व दुरुस्ती, तसेच आधुनिक मासेमारी साधनांचा वापर यांचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. जुलै ते डिसेंबर 2026 दरम्यान प्रशिक्षण हे प्रशिक्षण 1 जुलै 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत चालणार आहे. प्रशिक्षणासाठी दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थ्यांकडून प्रतिमहिना 100 रुपये, तर इतर प्रशिक्षणार्थ्यांकडून 450 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पात्रतेचे निकष प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे : • उमेदवार हा कार्यशील मच्छीमार व प्रकृतीने सुदृढ असावा.
• वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
• पोहता येणे आवश्यक.
• किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा.
• मासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
• आधारकार्ड अथवा बायोमेट्रिक ओळखपत्र असणे आवश्यक.
• विहित नमुन्यातील अर्जास संबंधित मच्छीमार संस्थेची शिफारस जोडणे आवश्यक.
• दारिद्र्यरेषेखालील अर्जदारांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत इच्छुक मच्छीमारांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज संबंधित मच्छीमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई – 61 येथे 19 जून 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क अधिक माहितीसाठी विजय कोळगे, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी (मो. 8779839743) तसेच जयहिंद सुर्यवंशी, यांत्रिकी निर्देशक (मो. 7507988552) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे किनारपट्टी भागातील युवकांना तांत्रिक कौशल्य प्राप्त होऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षित नौकानयन आणि इंजिन देखभालीचे प्रशिक्षण मिळाल्याने मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *