सोलापूर हादरले!:पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पतीने संपवले जीवन; 6 मिनिटांच्या सुसाईड व्हिडिओमध्ये रडत म्हणाला, "मी तुला आझाद करतोय…"

0
nmcover-placecover-marathi-3_1780471601.jpg




सोलापूरमधून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक कलह आणि अपमानातून एका 38 वर्षीय पतीने टोकाचे पाऊल उचलत मृत्यूला कवटाळले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीसाठी 6 मिनिटांचा एक अत्यंत भावुक आणि वेदनादायी व्हिडिओ बनवला असून, हा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जाकीर अब्दुल रज्जाक पटेल असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी जाकीर पटेल यांचे त्यांच्या पत्नीसोबत तीव्र घरगुती वाद झाले होते. या वादानंतर मनावर प्रचंड ताण असलेल्या जाकीर यांनी रात्री 8 वाजेच्या सुमारास राहत्या घरातील सिलिंग फॅनला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येमागील कारण: नातेवाईकांचे गंभीर आरोप “मी तुला आझाद करतोय…” : शेवटच्या व्हिडिओतील आर्त हाक जाकीर यांनी मृत्यूला जवळ करण्यापूर्वी 6 मिनिटांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये ते रडत-रडत आपल्या पत्नीला उद्देशून बोलत आहेत: “मी तुला आता नेहमीसाठी फ्री करतोय… आझाद करतोय. आता तुला टोकणारा, बोलणारा आणि अडवणारा कोणीही उरणार नाही. मी तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तू कधीच माझे ऐकले नाहीस. मी तुला आधीही बजावले होते की त्याला फोन करू नकोस, पण तू ऐकले नाहीस. तू सगळ्यांच्याच आयुष्याची धूळधाण केलीस…” पोलिसांचा तपास सुरू घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो विच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृत जाकीर यांच्या कुटुंबीयांनी समोर आणलेला हा व्हिडिओ आणि त्यांचे आरोप लक्षात घेऊन पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *