महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर:बंडखोरी अर्ज दाखल करणाऱ्यांनी अर्ज मागे घ्यावे, रवींद्र चव्हाण यांची विनंती
![]()
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, असे असूनही महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवू आणि जास्तीत जास्त जागा जिंकू असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, आपल्या सर्वांना माहीत आहे विधान परिषदेच्या निवडणुका ज्या 18 तारखेला होऊ घातलेल्या आहेत, त्यात एक पोटनिवडणूक आहे, जी नागपूरची आहे. आणि 16 विधानपरिषदेच्या असणाऱ्या या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात एनडीएचे सरकार अतिशय चांगल्या पध्दतीने काम करताना दिसत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई. या तिघांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी, कष्टकरी आणि या सगळ्यांसाठी हितावह असल्याचे निर्णय हे घेताना दिसत आहे. पुढे बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये या सर्व केंद्रीय नेते मंडळी आणि महाराष्ट्रातील नेते मंडळी, या सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की महायुतीमध्ये या सर्व निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून आपण पाहिले असेल की या सगळ्या जागांचे वाटप अतिशय चांगल्या पद्धतीने कसे होऊ शकते याचा निर्णय गेल्या काही दिवसात घेतला आहे. 1 तारखेला सर्व ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. 4 तारखेला अर्ज मागे घेण्याची वेळ आहे आणि अनेक ठिकाणी अर्ज मागे घेतले जातील. या निवडणुकांमध्ये मतदान जे आहे, त्या त्या ठिकाणच्या मतदारांची जी सूची आहे ती आयोगाने जाहीर केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगला मेसेज जाणे महत्त्वाचे होते. या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या पाहिजेत आणि सगळ्या जागांवर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा आपण करू. या साठी काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व नेते मंडळींची महत्त्वाची बैठक पार पडली. आता अधिकृत महायुतीचे उमेदवार कोण? हे जाहीर करण्याचे निर्देश कालच्या बैठकीत देण्यात आले आहेत. ते आज आपण घोषित करणार आहोत, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आहेत. तसेच जे बंडखोरी करत अर्ज भरले असतील त्यांनी अर्ज मागे घ्यावे अशी विनंती देखील चव्हाण यांनी केली आहे. महायुतीचे उमेदवार कोण?
