नांदेड जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक ठाण्यांमध्ये खांदेपालट

0


वजिराबाद येथे कुंभार;कदम भोकर;वाहतूक शाखेत मुंढे 

नांदेड (प्रतिनिधी –  नांदेड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला असून, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विविध पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत. या बदल्यांमुळे अनेक पोलीस ठाण्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांची भोकर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर भोकरचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्याकडे वजीराबाद पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

वाहतूक शाखेचा कारभार अनेक दिवसांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे होता. आता हा पदभार पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे.नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले कामठेवाड यांची मुखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अरविंद घोडके यांची कंधार पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

मुखेड येथे कार्यरत असलेले केंद्रे यांची हिमायतनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून, हिमायतनगरचे भगत यांना नायगाव पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. लोहा येथील पोलीस निरीक्षक नागनाथ राठोड यांच्याकडे जिल्हा विशेष शाखेचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्या जागी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांची सोनखेड पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.  राजकुमार इंगोले यांना माळाकोळी येथे नियुक्ती मिळाली आहे. माळाकोळीचे  महेश मुळीक यांना पुन्हा एकदा उस्माननगर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या व्यापक फेरबदलामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला अधिक गतिमान व प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे बोलले जात आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आज पहाट होताच आपले पदभार बदलण्याच्या मार्गावर आहेत.


Post Views: 62






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed