विश्वशांती बुद्ध विहारात संविधानाच्या शिलेदारांचा सन्मान; बक्षिस वितरण:बुद्धविहार समन्वय महासंघ, विश्वशांती बुद्ध विहाराच्या विद्यमाने आयोजन‎

0
240_17802198496a1bffc962f65_whatsappimage.jpg




प्रतिनिधी | अकोला विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांची रुजवणूक व्हावी आणि संविधानाचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने विश्वशांती बुद्ध विहार, रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला व बुद्ध विहार समन्वय महासंघ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “भारतीय संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेचा’ बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी बुद्ध विहार समन्वय महासंघाचे संस्थापक तथा जिल्हाध्यक्ष धम्मबोधी डोंगरे तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक नितीन ताकवाले, नगरसेविका वैशाली शेळके, पोलिस उपनिरीक्षक वानखडे, सदस्य मोतीराम गायकवाड उपस्थित होते. प्रास्ताविक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र दामोदर यांनी केले. या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट ज्ञानाच्या जोरावर यश मिळवणाऱ्या संविधानाच्या बाल शिलेदारांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. २९ मे रोजी संपन्न झालेल्या या विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेला स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. लेखी परीक्षेमधून स्पर्धकांच्या बौद्धिक क्षमतेचा कस लागला. या कठीण स्पर्धेतून अंतिम विजेते ठरलेल्या गुणवंतांना सन्मानित करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक विनोद किरतकार यांनी तर आभार राहुल हिवराळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *