राऊतांना अभिषेक बॅनर्जींचा पुळका..:..मग बंगालमधील हिंदू अन् कार्यकर्त्यांच्या हत्येवेळी गप्प का होता? नवनाथ बन यांचा सवाल
![]()
जनाब संजय राऊत यांना अभिषेक बॅनर्जी यांचा पुळका येत आहे. पण याच बंगालमध्ये भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांची, संघाच्या स्वयंसेवकांची आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या झाली त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा संजय राऊत गप्प बसले होते. ममता बॅनर्जी यांचे सरकार होते तेव्हा हिंदूना जगणं मुश्कील झाले होते, हिंदू माता-बहिणींवर जेव्हा अत्याचार झाले त्यावेळी राऊत काहीच बोलले नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचे सरकार असताना अनेक हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना मारले गेले. त्यावेळी राऊत काही बोलले नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांना सोडले नाही. आता जनता अभिषेक बॅनर्जीचा बदला घेऊ लागली आहे तर तुम्ही त्यांची बाजू घेत आहात. आम्ही हल्ल्याचे समर्थन करत नाही. पण आम्ही धडा शिकवू असा संदेश पश्चिम बंगालच्या जनतेने दिला आहे हे राऊतांनी लक्षात ठेवले पाहिजे. राऊतांकडून केवळ मस्करीचे काम नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केल्यावर देवाभाऊ आणि अमृता वहिनी हे सर्वसामान्यांप्रमाणे प्रवास करत आहेत. देवाभाऊ ट्रेनने प्रवास करतात. राऊत तुम्ही आवाहनाला प्रतिसाद देणार का? एखाद्या ठिकाणी काही चुकले असेल पण प्रत्येक वेळी थट्टा मस्करी करण्याचे काम राऊतांकडून सुरू असते. त्यांची थट्टा-मस्करी करण्याचे काम जनतेने केले आहे. तनपुरे जनतेतून निवडून येतात, तुमच्यासारखे मागच्या दाराने नाही महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत मविआ आणि उबाठाला राजकीय श्रद्धांजली वाहण्याचे काम केले आहे. तुमच्या पक्षाची कबर खोदण्याचे काम जनतेने विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्यावेळी केले आहे. त्यावर लक्ष दिले पाहिजे. प्राजक्त तनपुरे हे जनतेमधून निवडून येणारे नेते आहेत. ते तुमच्या सारखे मागच्या दाराने सभागृहात जात नाहीत. आपल्या पक्षात काय सुरू आहे ते बघा तुम्ही स्वत:च तुमचा पक्षाची कबर खोदली आणि पक्ष त्यामध्ये टाकला असा टोला बन यांनी लगावला आहे. राऊत, पाकिस्तानसाठी स्वतःचा बीपी वाढवून घेऊ नका! नवनाथ बन म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर 2 च्या चर्चा सुरू झाल्या आणि संजय राऊत यांचा बीपी वाढतो आहे. कारण ऑपरेशन 2 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवणार म्हटल्याने राऊतांचा चेहरा उतरतो आहे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवला त्यावेळी हेच संजय राऊत म्हणत होते की दहशतवादी जिंवत आहेत. पाकिस्तानचा उदो-उदो करणे हा पाकिस्तानचा धंदा झाला आहे. तुम्ही सरकारचा नाही तर सैन्याचा अपमान करत आहात. तुम्हाला पाकिस्तानचा बदला घ्यायचा नाही, तुम्हाला पाकिस्तानचा उदो-उदो करायचा आहे. राऊतांनी पाकिस्तानसाठी बीपी वाढवून घेऊ नये.
