वाढदिवस 18 दिवसावर असताना चिमुकल्याचा दुर्दैवी अंत:विजेच्या धक्क्याने झाला मृत्यू, कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-06-07t180415239_1780835777.jpg




येत्या 24 जून रोजी त्याचा वाढदिवस होता मात्र 18 दिवस आधीच त्याच्या घरात मृत्यूने मातम निर्माण केला आहे ही घटना आहे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील हमीदिया कॉलनी मलंग बाबा बिल्डिंग परिसरातील खेळण्यासाठी घराबाहेर गेलेला चिमुकला घरी परतलाच नाही त्याचा शोध घेतला असता रात्री उशिरा विजेच्या खांबालगत त्याचा मृतदेह आढळून आला विजेच्या खांबात विद्युत प्रवाह झाल्याने चिमुकल्याला मोठा धक्का बसला त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. मृत बालकाचे नाव आदिल साजिद खान पठाण (वय ७ वर्षे) असे आहे. आदिलचे वडील साजिद खान पठाण हे मूळचे लोहा तालुक्यातील रहिवासी असून कामानिमित्त नांदेड शहरातील हमीदिया कॉलनी परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. दिनांक 6 जून रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजता आदिल घरातून बाहेर गेला होता. बराच वेळ तो घरी परतला नाही म्हणून कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. तसेच व्हॉट्सॲप ग्रुपवर त्याचा फोटो टाकून शोध घेण्याचे आवाहनही करण्यात आले होते. दरम्यान, रात्री उशिरा परिसरातून जाणाऱ्या एका वाहनचालकाच्या नजरेस वीज खांबाजवळ एक मुलगा पडलेला दिसला. त्याने तत्काळ स्थानिक नागरिकांना माहिती दिली. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आदिल हा वीज खांबाला लागलेल्या करंटमुळे मृत झाल्याचे समोर आले. अंधार असल्याने आणि परिसरात तुटलेल्या सर्व्हिस वायरमुळे वीज खांबात करंट उतरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर आदिलला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या वेळी परिसरातील नागरिकांसह प्रभागातील नगरसेवकही उपस्थित होते. संतप्त नागरिकांनी एमएसईबीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत मुलाच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत व न्याय देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *