जड रोलर अंगावरून गेल्याने 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू:बार्शीत क्रिकेट समर कॅम्पमधील दुर्दैवी घटना; कोचवर निष्काळजीपणाचा आरोप

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-31t111707745_1780206494.jpg




बार्शीतील शिवशक्ती मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी 7 ते 7.30 च्या सुमारास क्रिकेटची खेळपट्टी (पिच) तयार करण्यासाठी वापरला जाणारा जड रोलर अंगावर गेल्याने आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय 15) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत आरवचे वडील योगीराज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रीतसर फी भरून आरवला या क्रिकेट कॅम्पमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. मात्र मैदानावर घडलेल्या या भीषण अपघातात त्यांना आपला मुलगा गमवावा लागला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे सराव सुरू असताना कोच विवेक दुगम आणि अक्षय देबडवार यांच्या सांगण्यावरून 7 ते 7.30 च्या सुमारास 12 ते 15 वर्षांची मुले खेळपट्टीवरील जड रोलर ओढत होती. यावेळी जवळ कोणताही प्रशिक्षक, तंत्रज्ञ किंवा मोठी व्यक्ती उपस्थित नव्हती आणि कोचही लांब उभे होते. हा जड रोलर ओढत असताना अचानक आरवचा तोल गेला आणि तो खाली पडला. दुर्दैवाने हा रोलर त्याच्या पायापासून छातीपर्यंत अंगावरून गेल्याने त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याला तातडीने जगदाळे मामा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी बार्शी पोलिस पुढील तपास करत आहेत. दुर्घटना नेमकी कशी घडली? बार्शीतील शिवशक्ती मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. क्रिकेटची खेळपट्टी (पिच) तयार करण्यासाठी वापरला जाणारा जड रोलर अंगावर गेल्याने आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय 15, रा. सुभाषनगर, बार्शी) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी 7 ते 7.30 च्या सुमारास घडली. आरवचे वडील योगीराज चौधरी (वय 45) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रीतसर फी भरून आरवला या क्रिकेट कॅम्पमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. या निष्पाप जीवाच्या मृत्यूमुळे संपूर्ण बार्शी शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या जबाबात प्रशिक्षकांच्या (कोच) निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत. शनिवारी सकाळी आरव सरावासाठी गेला असता, कोचच्या सांगण्यावरून 12 ते 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलांकडून खेळपट्टीवरील जड रोलर ओढून घेतला जात होता. अत्यंत धोकादायकपणे हे काम सुरू असताना जवळ कोणताही प्रशिक्षक, तंत्रज्ञ किंवा मोठी व्यक्ती उपस्थित नव्हती आणि स्वतः कोचही लांब उभे होते. हा जड रोलर ओढत असताना अचानक आरवचा तोल गेला आणि तो खाली पडला. दुर्दैवाने तो रोलर त्याच्या पायापासून छातीपर्यंत अंगावरून गेल्याने त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याला तातडीने जगदाळे मामा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *