साहेबराव गुट्टे नांदेडचे पोलीस उप अधीक्षक मुख्यालय 

0
WhatsApp-Image-2026-05-29-at-16.15.16.jpeg


17 पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त पदोन्नती-बदली आदेश जारी

नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन च्या गृह विभागाने पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) पदावरील पदोन्नती व बदलीसंदर्भातील आदेश जारी केले आहेत. नियमित निवडसूची 2025-26 अंतर्गत 17 पोलीस निरीक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देऊन विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

पदोन्नती व बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे

  1. विजय शंकरराव निकोळे – सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर
  2. शिवाजी पर्वतराव गवारे – सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर
  3. नामदेव तुकाराम वाघमारे – सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
  4. राजू दादा अडागळे – सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर
  5. आप्पासाहेब नामासाहेब जाधकर – सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर
  6. सुनिल शंकर शिंदे – सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई
  7. संजय बाजीराव बेंडे – सहायक पोलीस आयुक्त, डायल-112, नवी मुंबई
  8. वैभव विजय धुमाळ – सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
  9. अर्जुन गोविंदराव बोत्रे – सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर
  10. सुनिल महादेव यादव – सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
  11. शेषराव आबाजी उदार – पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण
  12. रागिणी रामचंद्र वाघमारे – सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
  13. राजीव आसाराम तळेकर – अपर पोलीस अधीक्षक (एपी), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड
  14. साहेबराव लक्ष्मणराव गुट्टे – पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, नांदेड
  15. लक्ष्मण अनंत कांबळे – सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर
  16. भास्कर दत्तात्रय कदम – सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
  17. तानाजी भिवा दराडे – पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण

सरकारच्या आदेशानुसार या पदोन्नत्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असून त्या न्यायालयीन निर्णय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहणार आहेत.


Post Views: 1,137






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *