Rohini Paradhye Case | रोहिणी पाराध्ये प्रकरणातील दुसरी धक्कादायक बाजू आली समोर!

0
Rohini-Paradhye-Case.webp.webp


Rohini Paradhye Case | मंगळवेढा (Mangalwedha) येथील प्रसिद्ध रिल स्टार रोहिणी पाराध्ये (Rohini Paradhye) हिच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणातील विविध पैलूंवर चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रोहिणीने ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या किचनमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र, तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि व्यवसायातील तणावाबाबत आता नवीन माहिती समोर येत आहे.

रोहिणी पाराध्ये (Rohini Paradhye) आणि तिचा पती निलेश पाराध्ये (Nilesh Paradhye) हे सोशल मीडियावर लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जात होते. इन्स्टाग्राम (Instagram) आणि युट्यूब (YouTube) या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या रिल्स आणि व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. मात्र, निलेशला भेटण्यापूर्वी रोहिणीचं लग्न झालं होतं, अशी माहिती समोर आली आहे. पहिल्या लग्नानंतर घटस्फोट झाल्यानंतर तिची आणि निलेशची ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि नंतर त्यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला.

लग्नानंतर हे दोघे पुणे (Pune) येथे राहत होते. त्याच काळात त्यांनी सोशल मीडियावर कंटेंट तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या व्हिडीओंना मिळणारा प्रतिसाद वाढत गेल्यानंतर त्यांनी मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्यातील मूळ गावी जाऊन ‘हॉटेल ग्रामपंचायत’ हा व्यवसाय सुरू केला. हॉटेलच्या किचनमध्ये बनवलेले त्यांच्या अनेक रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांनी आणखी दोन शाखा सुरू केल्या होत्या.

Rohini Paradhye Case | व्यवसायातील तणाव वाढल्याची चर्चा :

‘हॉटेल ग्रामपंचायत’चा व्यवसाय वाढत असताना त्याचे व्यवस्थापन करणे आणि आर्थिक घडी सांभाळणे कठीण होत असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. एकापेक्षा अधिक शाखा सुरू झाल्यानंतर कामाचा ताण वाढला होता. आर्थिक व्यवहार, शाखांचे नियोजन आणि व्यवसायातील जबाबदाऱ्या यामुळे रोहिणी आणि निलेश यांच्यात सतत वाद होत असल्याचे बोलले जात आहे. या तणावामुळेच रोहिणीने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

26 मे रोजी दुपारी एकच्या सुमारास रोहिणीने ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या किचनमध्ये गळफास घेतल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आत्महत्येमागे आणखी काही कारणे होती का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. मंगळवेढा (Mangalwedha) पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून अद्याप अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही.

News title : Rohini Paradhye Case New Details

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed