इलेक्ट्रिक वाहनांमुळे दररोज 11 हजार लिटर डिझेलची बचत:पुणे MSRTC विभागात उपाययोजना; अरुण सिया यांची माहिती

0
1e504256-4b01-499d-80e9-79344c5e68ff_1780060408220.jpg




पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने डिझेल बचत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे दररोज सुमारे ११ हजार लिटर डिझेलची बचत होत असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. पुणे विभागात सध्या १०५ इलेक्ट्रिक वाहने कार्यरत आहेत. ही वाहने दररोज ४६ हजार २३२ किलोमीटर धावतात, ज्यामुळे अंदाजे १० हजार ९८१ लिटर डिझेलची बचत होते. येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर पूर्ण क्षमतेने करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सिया यांनी सांगितले. याशिवाय, पुणे विभागातील प्रत्येक आगाराला डिझेल बचतीसाठी विशिष्ट उद्दिष्टे निश्चित करून देण्यात आली आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत प्रति १० लिटरमध्ये १ किलोमीटरने (केपीटीएल) वाढ करण्याच्या सूचना प्रत्येक आगाराला देण्यात आल्या आहेत. कमी उत्पन्न देणाऱ्या फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत. विभाग आणि आगार पातळीवर चालकांच्या केपीटीएलमध्ये वाढ होण्यासाठी त्यांना प्रबोधन केले जात आहे. तसेच, वरिष्ठ स्तरावरूनही या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत, असेही सिया यांनी नमूद केले. ऑटोरिक्षा नोंदणी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन ज्या अर्जदारांनी ऑटोरिक्षा परवान्यासाठी इरादापत्र घेतले आहे परंतू इरादापत्राची मुदत संपलेली आहे, अशा अर्जदारांनी ३० जून पर्यंत ऑटोरिक्षा खरेदी करून वाहन नोंदणीची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी. दिनांक १ जुलै नंतर या वाहनांची नोंदणी होणार नाही याची. नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगम ब्रिज, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed