पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करुन सामान्यांना दिलासा द्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी
नांदेड (प्रतिनिधी) -पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्युटीत कपात करावी, राज्य सरकारने आपल्या करांमध्ये सवलत द्यावी तसेच नांदेड-वाघाळा महानगरपालिकेने इंधनावर लावलेला सेस कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नांदेड जिल्हा शाखेने केली आहे.
पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होत असून त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींवरही दिसून येत आहे. त्यामुळे महागाई वाढत असून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडत आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकारने एक्साईज ड्युटीत कपात तर राज्य सरकारनेही करांमध्ये कपात करून नागरिकांना दिलासा द्यावा. त्याचबरोबर नांदेड-वाघाळा महानगरपालिकेने इंधनावरील सेसचा फेरविचार करून त्यात कपात करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरांवरील सरकारांनी जनतेच्या हिताचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या प्रसिद्धी पत्रकावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सील सदस्य ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, जिल्हासचिव कॉ.शिवाजी फुलवळे, सहसचिव कॉ.देवराव नारे, शहरसचिव कॉ.वैशाली धुळे, कॉ.प्रकाश बैलकवाड, कॉ.गणेश संदुपटला, कॉ.भगवान नाईक आदींच्या स्वाक्षर्या आहेत.