आखाती देशांत नाशिकमधून 1100 बाेकडांची निर्यात:युद्धामुळे थंडावलेली निर्यात बकरी ईदमुळे पुन्हा सुरू

0
new-project-2026-05-27t100411092_1779856517.jpg




ओझर विमानतळावरून शारजाहसह इतर आखाती देशांमध्ये जिवंत बोकड आणि मेंढ्यांच्या निर्यातीला येऊ घातलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गती मिळाली आहे. इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम आखाती देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीवरही झाला होता. यामुळे दोन महिने निर्यात थंडावली होती. मात्र, याच आठवड्यात 1100 बोकड कार्गो विमानाद्वारे निर्यात झाले आहेत. नाशिकचा कांदा, द्राक्ष, डाळिंब, फुलांनंतर आता येथील बोकडांनाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, विशेषत: आखाती देशात मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओझर विमानतळावरील अत्याधुनिक कार्गो टर्मिनल, प्राण्यांच्या आरोग्य तपासणी आणि सर्टिफिकेशनची सुविधा आणि कस्टम क्लिअरन्सच्या सुलभ सुविधेमुळे उत्तर महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना थेट आखाती देशांमध्ये माल पाठवणे सोपे झाले आहे. दुबई, शारजाह, ओमान आणि कुवेत या देशांमध्ये नाशिकच्या बोकडांना विशेष पसंती दिली जात आहे. व्यवहार होताहेत पूर्ववत अमेरिका-इराण युद्धामुळे आखाती देशांमधील हवाई क्षेत्रात निर्माण झालेल्या तणावामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ कार्गो फ्लाईट्स थांबवण्यात आल्या होत्या. मात्र, परिस्थिती सामान्य होत असून, पुन्हा एकदा नाशिक विमानतळावरून ही वाहतूक जोमाने सुरू झाली आहे. यंदाच्या मोसमात निर्यातीचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत निघण्याची शक्यता आहे. -सी. एस. सिंग, निर्याततज्ज्ञ आर्थिक वर्ष 2026-27 च्या सुरूवातीलाच ‘ब्रेक’ 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या 2026-27 या आर्थिक वर्षाला पहिल्या दोन महिन्यातच ब्रेक लागला होता. इराण, अमेरिकेत सुरू झालेले युद्ध, युएई, ओमान, कतारपर्यंत भडकल्याचा परिणाम बोकड निर्यातीवर झाला होता. मात्र, काही काळापासून युद्धबंदी झाल्याने ही निर्यात ईदच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू झाली आहे. आर्थिक वर्ष फ्लाईट्स निर्यात देश 2023-24 45 32,000 शारजाह, दुबई
2024-25 62 48,500 शारजाह, ओमान, कुवेत
2025-26 78 58,000 शारजाह, दुबई, कतार
(स्रोत : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कार्गो विभाग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed