परभणी-हिंगोली विधान परिषदेसाठी शिंदेसेनेचा दावा कायम:विप्लव बाजोरिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-27t191821326_1779889763.jpg




परभणी-हिंगोली विधान परिषदेसाठी महायुतीकडून शिंदेसेनेने आपला दावा कायम ठेवला असून महायुतीकडून पुन्हा एकदा माजी आमदार विप्लव बाजोरीया यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे विश्‍वसनीय सुत्रांनी सांगितले. तर खासदार श्रीकांत शिंदे गुरुवारी ता. ३० हिंगोलीत येणार असून यावेळी ते काही पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. परभणी- हिंगोली विधान परिषदेची जागा महायुतीकडून शिंदेसेनेकडे आहे. या विधान परिषदेसाठी महायुतीचे ३३५ मतदार असून आघाडीकडे १३० मतदार आहेत. त्यामुळे मतदरांचे बहुमत महायुतीकडे असल्याने येथील जागा महायुती जिंकणार असा दावा केला जात आहे. त्यानुसार महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी तयारी देखील केली आहे. हिंगोली जिल्हयात हिंगोलीचे आमदार भाजपाचे तान्हाजी मुटकुळे, कळमनुरीचे आमदार शिंदेसेनेचे संतोष बांगर, वसमतचे आमदार राष्ट्रवादीचे राजेश नवघरे असून जिल्हयात महायुतीचेच आमदार आहेत. या शिवाय जिल्हयातील बहुतांश नगर पालिका व नगरपंचायतीवर महायुतीचेच वर्चस्व आहे. परभणी जिल्हयातही हिच परिस्थिती आहे. त्यामुळे परभणी-हिंगोली विधान परिषदेची निवडणुक महायुतीसाठी सोपी असणार असल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होणार असा दावा करून राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे यांनी हि जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र राजकिय गणिते लक्षात घेता शिंदेसेनेने या जागेवरील दावा कायम ठेवला आहे. महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या चर्चेतून परभणी-हिंगोली शिंदेसेनेला सोडण्यावर एकमत झाल्याचीही चर्चा आहे. तसेच शिंदेसेनेकडून माजी आमदार विप्लव बाजोरीया यांच्या नावांवर एकमत झाल्याचे विश्‍वनसीय सुत्रांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा बाजोरीया त्यांची जादू चालविणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. माजी आमदार बाजोरीया यांनी आपलाच पर्यायाने महायुतीचाच विजय होणार असल्याचा दावाही केला आहे. या शिवाय आता विरोधी गटाकडून अद्यापपर्यंत कुठल्याही हालचाली नसल्या तरी ऐनवेळी आघाडीकडून कोण उमेदवार देणार याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed