8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकीसह पगार कधी मिळणार? सर्वात मोठी गुड न्यूज समोर
8th Pay Commission | केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. वेतनवाढ, थकबाकी आणि इतर आर्थिक लाभांबाबत आयोगाकडून विविध संघटनांशी चर्चा सुरू असून आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना वाढीव पगारासह एरिअर्स मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या आयोगाच्या शिफारसी आणि फिटमेंट फॅक्टरवर चर्चा वेगात सुरू आहे.
8वा केंद्रीय वेतन आयोग अद्याप लागू झालेला नसला तरी त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. वेतन, पेन्शन, भत्ते, सेवा अटी आणि इतर आर्थिक लाभांबाबत कर्मचारी संघटना आणि विविध विभागांशी आयोग चर्चा करत आहे. या चर्चेनंतर तयार होणारा अंतिम अहवाल मंत्र्यांच्या गटाकडे पाठवला जाणार असून मंजुरीनंतरच आयोगाची अंमलबजावणी केली जाईल.
कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीसह सुधारित वेतन मिळण्याची अपेक्षा आहे. जर आयोग 2027 अखेरपर्यंत लागू झाला तर कर्मचाऱ्यांना मागील कालावधीतील एरिअर्स मिळू शकतात. विशेषतः 1 ते 5 श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सुमारे 20 महिन्यांची थकबाकी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ही रक्कम नेमकी किती असेल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
8th Pay Commission | फिटमेंट फॅक्टरवर संघटनांचा जोर :
8व्या वेतन आयोगाने अलीकडेच (Lucknow) येथे बैठक घेत विविध कर्मचारी संघटना आणि केंद्र सरकारच्या विभागांशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या मागण्या, अडचणी आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी आयोग विविध राज्यांमध्ये दौरे करत आहे. जून 2026 मध्ये (Jammu and Kashmir) आणि (Ladakh) येथेही बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची जोरदार मागणी केली आहे. National Council-Joint Consultative Machinery (NC-JCM) या शिखर संघटनेने 3.833 फिटमेंट फॅक्टर आणि 69 हजार रुपये किमान मूळ वेतनाची मागणी केली आहे. तसेच All India Defence Employees Federation यांनीही 3.83 फिटमेंट फॅक्टरचा प्रस्ताव दिला आहे.
तर Indian Railways Technical Supervisors Association या संघटनेने विविध श्रेणींनुसार 2.92 ते 4.38 पर्यंत फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी 7व्या वेतन आयोगाच्या वेळी NC-JCM ने 3.71 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली होती. मात्र त्यावेळी आयोगाने 2.57 फिटमेंट फॅक्टरची शिफारस केली होती आणि तीच नंतर लागू करण्यात आली होती.
