विधान परिषद निवडणूक: दोन दिवसांत 39 अर्जांची उचल:अमरावती मतदारसंघात 11 उमेदवारांसाठी 23 अर्ज नेले

0
afff1815-f486-4fc2-aa40-312529ccdf77_1779809074791.jpg




अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण ३९ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली आहे. मंगळवारी, दुसऱ्या दिवशी ११ उमेदवारांसाठी २३ अर्ज नेण्यात आले. सोमवारी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी १६ अर्जांची उचल झाली होती. त्यानंतर मंगळवारी आणखी २३ अर्ज नेण्यात आल्याने एकूण संख्या ३९ वर पोहोचली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदीनुसार, महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख दावेदारांसाठी सोमवारीच अर्ज नेण्यात आले होते. मंगळवारी, माजी उपमहापौर आणि समता परिषदेचे नेते डॉ. गणेश खारकर यांच्यासाठी ३, तर त्यांच्या पत्नी अरुणा खारकर यांच्यासाठी २ अर्जांची उचल झाली. याव्यतिरिक्त, भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्यासाठी ३, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. प्रवीण इचे यांच्यासाठी ३, नागपूरचे उद्योजक हर्षजीत देशमुख यांच्यासाठी ४, ॲड. धनंजय तोटे यांच्यासाठी २ आणि इतर सात उमेदवारांसाठी प्रत्येकी एक अर्ज नेण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून आहे. प्रशासनाने कळविल्याप्रमाणे, ईदनिमित्त गुरुवार आणि साप्ताहिक सुटीनिमित्त रविवारी या विभागाला सुटी राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed