Heatwave Alert | पुढील २४ तास प्रचंड थरारक! महाराष्ट्रात भयंकर उष्णतेची लाट; ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट
Heatwave Alert | राज्यात मान्सूनपूर्व काळात उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांत तीव्र उष्णतेची लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मोबाईल अलर्टद्वारे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले असून प्रशासनानेही खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार अमरावती , चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर (Nagpur) आणि वर्धा (Wardha) जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत उष्णतेची तीव्र लाट अनुभवायला मिळू शकते. काही ठिकाणी रात्रीदेखील तापमान जास्त राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे विदर्भातील नागरिकांना मोबाईलवर थेट अलर्ट मेसेज पाठवण्यात आले. अनेकांच्या मोबाईल स्क्रीनवर अचानक सूचना झळकल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने मात्र घाबरून न जाता काळजी घेण्याचे आणि उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे.
Heatwave Alert | मोबाईल अलर्टमुळे नागरिक सतर्क :
अचानक मोबाईलवर आलेल्या अलार्म आणि संदेशांमुळे ही उष्णतेची लाट गंभीर असू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, उन्हात बाहेर पडताना डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि शक्यतो घरातच राहणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून पुढील काही दिवसांत आणखी सूचना जारी केल्या जाऊ शकतात.
