Gold Rate | सोनं खरेदीची सुवर्णसंधी? पाहा आजचे लेटेस्ट दर
Gold Rate | भारतात सोन्या-चांदीची खरेदी ही केवळ गुंतवणूक नसून परंपरेचाही भाग मानली जाते. लग्नसराई, सण-उत्सव किंवा खास प्रसंगी नागरिक मोठ्या प्रमाणावर दागिने व चांदीच्या वस्तू खरेदी करतात. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या किमतीत सातत्याने बदल होत असून मंगळवार 26 मे रोजी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण नोंदवली गेली आहे. तर चांदीचे भाव मात्र स्थिर राहिले आहेत.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या. त्यानंतर शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत दर कमी झाले. सोमवारी सराफा बाजार सुरू झाल्यानंतर (Mumbai) मध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 320 रुपयांची वाढ झाली होती. मात्र मंगळवार 26 मे रोजी पुन्हा दर खाली आले असून 24 कॅरेट सोन्यात 490 रुपयांची घसरण दिसून आली आहे.
देशाची राजधानी दिल्ली (Delhi) येथे आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,59,530 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,46,250 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 1,19,640 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. आर्थिक राजधानी (Mumbai) मध्ये 24 कॅरेट सोनं 1,58,890 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले असून 22 कॅरेटसाठी 1,45,650 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 1,19,170 रुपये मोजावे लागत आहेत.
Gold Rate | पुणे, चेन्नईसह प्रमुख शहरांतील दर :
पुणे (Pune) शहरातही आज सोन्याचे दर मुंबईप्रमाणेच कायम आहेत. येथे 24 कॅरेट सोन्यासाठी 1,58,890 रुपये, 22 कॅरेटसाठी 1,45,650 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 1,19,170 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. तसेच कोलकाता (Kolkata) मध्येही हेच दर कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमती जवळपास समान पातळीवर असल्याचे दिसत आहे.
चेन्नई (Chennai) येथे मात्र इतर शहरांच्या तुलनेत सोन्याचे दर अधिक आहेत. येथे 24 कॅरेट सोनं 1,60,690 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 1,47,300 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 1,23,600 रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत प्रतिकिलो चांदीचा दर 2,85,000 रुपये असून प्रति ग्रॅम चांदी 285 रुपयांवर स्थिर आहे.
देशात वाढत्या सोन्याच्या आयातीमुळे परकीय चलन साठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांनी यापूर्वी नागरिकांना अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून भविष्यातील आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी परकीय चलन साठा सुरक्षित राहू शकेल.
