अक्कलकोटवरून परतताना भाविकांवर काळाचा घाला:वर्ध्याजवळ कारची उभ्या ट्रकला धडक; दोन महिलांचा मृत्यू, 8 जण गंभीर

0
new-project-2026-05-23t191920959_1779544614.jpg




पंढरपूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शन आटोपून अत्यंत आनंदाने नागपूरकडे परतणाऱ्या भाविकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. तुळजापूर-नागपूर महामार्गावरील सालोड-नागठाणा परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (२३ मे) पहाटेच्या सुमारास झालेल्या कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात नागपूरच्या दोन महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर ६ वर्षांच्या चिमुरड्या पाहुण्यासह एकूण आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्रभर ड्रायव्हिंग केल्यामुळे चालकाला अचानक आलेली झोपेची डुलकी या मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील गजानन नगर परिसरातील महिला मंडळातील काही सदस्य आपल्या मुला-बाळांसह ‘इर्टिगा’ कारने (क्र. MH 49 U 0179) पंढरपूर व अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून सर्वजण याच महामार्गाने नागपूरकडे परतत होते. कारने रात्रीच्या वेळी अक्कलकोट ते वर्धा असा तब्बल ५२८ किलोमीटरचा मोठा प्रवास पूर्ण केला होता. शनिवारी सकाळी गाडी सालोड-नागठाणा परिसरातील पेट्रोल पंपाजवळ आली असता, कार चालकाला डुलकी आली. यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मोठ्या ट्रकला (क्र. UP 70 LT 0830) कारने पाठीमागून प्रचंड वेगात धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. दोन्ही महिलांचा जागीच अंत; परिसरात खळबळ अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांनी मोठ्या कष्टाने बाहेर काढले. मात्र, या अपघातात किशोरी संदीप उके (वय ४९) आणि मोनाली निलेश मेश्राम (वय ३७, दोन्ही रा. गजानन नगर, नागपूर) यांचा गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला होता. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू या अपघातात कारमधील इतर ८ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने वर्ध्याच्या सावंगी मेघे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती अद्यापही अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. तुषार लक्ष्मणराव जाधव (वय ३७ – वाहन चालक), तनिष चंद्रशेखर उके (वय ६), दिव्यांशी निलेश मेश्राम (वय १०), आराध्य संतोष उके (वय १३), ईशान्य अनिल बारसकर (वय १७), नीता अनिल बारसकर (वय ५५), साधना अनिल बारसकर (वय ५६), कांचन चंद्रशेखर उके (वय ४२) अशी जखमींची नावे आहेत. ‘अवघे ७२ किमी उरले होते…’ गजानन नगरवर शोककळा अक्कलकोटवरून निघाल्यानंतर चालकाने रात्रीच्या वेळी सलग प्रवास केला होता. नागपूरचे घर अवघे ७२ किलोमीटर अंतरावर उरले असतानाच काळाने भाविकांवर घाला घातला. देवदर्शन करून सुखरूप घरी परतण्याच्या काही तास आधीच हा भीषण अपघात घडल्याने नागपूरच्या गजानन नगर परिसरात सर्वत्र तीव्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक पोलिस या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed