तक्रार बेदखल:मोहोळमध्ये अघोरी बाबाचा ‘साम, दाम, दंड, यंत्र, तंत्र''चा दावा‎, करणी उतरवत असल्याचा अघोरी महाराजाचा दावा

0
250_17793827006a0f39ac892b7_71468603729.jpg




करमाळा, माढ्यानंतर मोहोळमधील तथाकथित भोंदू अघोरी महाराजाची कहाणी पुढे आली आहे. कारवर ’साम, दाम, दंड, यंत्र, मंत्र, तंत्र’ अशा आशयाचा फलक लावून राजरोस वावरणा-या तथाकथित अघोरी बुवावर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने मोहोळ पोलिसांत ३ दिवसांपूर्वी केली असली तरी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नसल्याची समोर आले. कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून हा प्रकार व्हायरल करताच भोंदूच्या चौकशीचे आश्वासन पोलिसांनी समितीला दिले आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या भोंदू खरात, भोंदू मनोहर मामा महाराज, भोंदू गुरु माऊली यांच्यासह विविध प्रकरणे राज्यासह सोलापुरात समोर आली आहेत. दरम्यान मोहोळ मध्ये कार गाडीला साम, दाम, दंड, यंत्र, मंत्र, तंत्र अशा आशयाची व बाजूला दोन मानवी कवट्यांची व हाडांची चित्रे असलेला फलक लावून राजरोसपणे मुक्त संचार करणाऱ्या अघोरी महाराजावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोहोळचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना ३ दिवसांपूर्वी निवेदन दिल्याचे अंनिसचे राज्य सरचिटणीस सुधाकर काशीद व जिल्हा कार्याध्यक्ष धर्मराज चवरे यांनी सांगितले. अघोरी महाराजांच्या क्लिपची लिंक देण्यासाठी गुरुवारी पुन्हा काशीद, चवरे, मनोहर गोडसे, बिरमल खांडेकर आदी कार्यकर्ते पुन्हा पोलिसांना भेटल्याने अघोरी महाराज सावध झाल्याचे सांगण्यात येते. अघोरी महाराजाने कारवर (एमएच १३ सीएस ४९०६) स्वताला अघोरी महाराज संबोधून साम, दाम, दंड, यंत्र, मंत्र, तंत्र अशा आशयाची व दोन मानवी कवटी व हाडांचे चित्र असलेली ३ डी प्रतिकृती असलेली नंबर प्लेट लावलेली आहे. यामुळे लोकांमध्ये घबराट, दहशत पसरवली जात आहे. अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. वाहनावर अवैध फलक लावल्याप्रकरणी कारवाई करावी. अघोरी महाराजाच्या उपचाराने बळी पडलेल्या पीडितांचा शोध घ्यावा, अशी मागणी निवेदनात अंनिसने केली आहे. ^अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांनी माझ्या विरोधामध्ये निवेदन दिले आहे. मी देखील त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देणार आहे. हिंदू धर्माचे तेरा आखाडे आहेत. आम्ही काही वेगळं करत नाही. बेकायदेशीर लुटमार आमचा उद्देश नाही. साधना करताना माझ्याकडे आलेल्या लोकांना चांगले मार्गदर्शन करतो. संकटातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो. हे काही चुकीचे आहे का? आमच्याकडे यावे म्हणून जाहिरात केली नाही. गाणगापुरला गेल्यानंतर आरतीच्या वेळी लोक उलटं चढतात ते काढणारा मी माणूस आहे. -अघोरी महाराज सागर, मोहोळ ^मोहोळ शहरातील बागवान चौकामध्ये अघोरी बाबा राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर मिळालेले फोटो हे नाव न सांगण्याच्या अटीवर देण्यात आले आहेत. त्याचबरोबर समाज माध्यमांवर देखील फोटो आहेत. हा दुसरा भोंदू बाबा अशोक खरात असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करावी. सुधाकर काशीद, राज्य सरचिटणीस, अंनिस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed