स्थानिक स्वराज्य संस्थेचे 581 मतदार निवडणार विधान परिषदेतील आमदार:1 जूनपर्यंत अर्ज स्वीकारणार, 18 जून रोजी मतदान, 22 जूनला मतमोजणी

0
orig_new-project-2026-05-22t064009928_1779412267.jpg



छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ५८१ मतदार आहेत, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी गुरुवारी (२१ मे) पत्रकार परिष

.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे १२५, जिल्हा परिषद ६३, पंचायत समिती ९ तर नगर पंचायत, नगर परिषद व छावणी परिषदेचे १६३ मतदार असतील. जालना मनपाचे ७१, नगर पंचायत, नगर परिषदेचे ७४ आदी मिळून ५८१ मतदार आहेत. लवकरच मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे. यामध्ये जालना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक न झाल्याने त्यांचे मतदान नसतील आहे. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दोन्ही जिल्ह्यांत आचारसंहिता लागू

अपर जिल्हाधिकारी अडकुणे यांनी सांगितले की, या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून आलेले, नियुक्त केलेले सभासद मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक घोषणेनंतर दोन्ही जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली आहे.

भाजपची प्रथमच प्रबळ

संभाजीनगर मनपा व जि. प. भाजपाची ताकत वाढली आहे. जालना जिल्ह्यामध्ये देखील भाजप प्रबळ आहे. मतदारसंघात भाजपचे २५७ मतदार आहेत. या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात प्रथमच भाजपची ताकद वाढली आहे.

निवडणूक वेळापत्रक निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी : २५ मे उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : १ जून अर्ज छाननी : २ जून अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस : ४ जून मतदान : १८ जून (सकाळी ८ ते दुपारी ४) मतमोजणी : २२ जून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed