8th Pay Commission | वार्षिक इंक्रीमेंटचे नियम बदलणार? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर!

0
8th-Pay-Commission.webp.webp


8th Pay Commission | केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार विविध कर्मचारी संघटनांशी चर्चा करत असून त्यांच्या मागण्यांवर विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांनी सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीसह किमान पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणा (National Joint Consultative Machinery) मार्फत आठव्या वेतन आयोगाला (8th Pay Commission) आपले निवेदन सादर केले आहे. या निवेदनात सध्याच्या वेतन पुनरावलोकन प्रणालीमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्येक वेतन आयोगासाठी दहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागू नये, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे.

महागाई आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून दर पाच वर्षांनी वेतनात सुधारणा करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. याशिवाय, सध्या लागू असलेली 3 टक्के वार्षिक वेतनवाढ वाढवून ती 6 टक्के करण्याचा प्रस्तावही सरकारसमोर ठेवण्यात आला आहे. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर सन्मानाने जीवन जगण्यासाठी अधिक वेतनवाढ आवश्यक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

8th Pay Commission | किमान पगार 69 हजार करण्याचा प्रस्ताव :

आठव्या वेतन आयोगाअंतर्गत (8th Pay Commission) विविध पे-स्केलचे एकत्रीकरण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. विशेषतः लेव्हल-1 मधील कर्मचाऱ्यांसाठी सुरुवातीचा किमान पगार जवळपास 69 हजार रुपये प्रतिमहिना असावा, असा प्रस्ताव कर्मचारी संघटनांनी मांडला आहे. समान आणि न्याय्य वेतन रचना देशासाठी आवश्यक असल्याचे संघटनांचे मत आहे.

संघटनांच्या मते, आकर्षक वेतन संरचनेमुळे गुणवंत तरुण सरकारी सेवेकडे आकर्षित होतील आणि अनुभवी कर्मचारीही सेवेत टिकून राहतील. त्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढून शासकीय कामकाज अधिक गतिमान होईल. तसेच वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांची खरेदी क्षमता वाढेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम बाजारपेठेवर होईल, असेही संघटनांनी स्पष्ट केले आहे.

सरकारी खर्चाबाबत नेहमी प्रश्न उपस्थित केले जात असले तरी कर्मचारी संघटनांनी वेतनवाढ ही खर्च नसून देशाच्या आर्थिक विकासातील गुंतवणूक असल्याचे मत व्यक्त केले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वाढल्यास बाजारात मागणी वाढेल, परिणामी उत्पादन आणि करसंकलनालाही चालना मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाला (8th Pay Commission) आपला अंतिम अहवाल आणि शिफारसी सादर करण्यासाठी जवळपास 18 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

News title : 8th Pay Commission Salary Update

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed