शहरातील इंधनाचा 20 टक्के पुरवठा बाधित; पेट्रोल-डिझेलची रेशनिंग सुरू:जिल्ह्यातील शेकडो पेट्रोलपंपांना मनमाडमधून आणावे लागतेय इंधन
![]()
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर समुद्रमार्गे होणारा कच्च्या तेलाचा (क्रूड ऑईल) पुरवठा कमालीचा विस्कळीत झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींची थेट झळ आता बसू लागली आहे. पेट्रोल पंपांना होणारा पुरवठा सुमारे २० टक्
.
पुरवठा घटल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप कोरडे पडले असून ते बंद ठेवावे लागत आहेत. शहरात २० तर जिल्ह्यात सुमारे १२५ पेट्रोल पंप आहेत. तसेच शेतकऱ्यांची पूर्वमशागतीसाठी ट्रॅक्टरला डिझेलची मागणी वाढली आहे. उपलब्ध असलेला मर्यादित साठा सर्व नागरिकांना मिळावा, यासाठी पेट्रोल पंप चालकांनी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने इंधनाचे “रेशनिंग’ सुरू केले आहे. त्यानुसार दुचाकी वाहनांना एका वेळी जास्तीत जास्त २०० रुपयांचे, तर चारचाकी वाहनांना दोन हजार रुपयांचेच इंधन दिले जात आहे. अकोल्यात सध्या पेट्रोल १०८ रुपये आणि डिझेल ९५ रुपये प्रति लिटर आहे. मात्र, टंचाईच्या भीतीने ग्राहकांमध्ये ‘पॅनिक बायिंग’ सुरू झाले असून, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
पंप काही वेळ होता ‘ड्राय’ ^बीपीसीएल, एचपीसीएल कंपन्यांचा पुरवठा काहीसा कमी असल्याने ग्राहकांचा ओढा इंडियन ऑइलकडे वाढला आहे. वाशीम जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा असल्याने तेथील ग्राहकही अकोल्याकडे वळत आहेत. सध्या अकोला जिल्ह्यात दररोज सुमारे १०० ते १२५ इंधन टँकर्स येत आहेत. काही टँकर्स आता गायगावऐवजी मनमाडवरून भरून आणावे लागत असल्याने वाहतुकीला वेळ लागत आहे. यामुळे काही काळ पंप कोरडे रहात आहेत. – नवीन सिंह ठाकूर, अध्यक्ष, पेट्रोल डिझेल असोसिएशन.
महागाईची टांगती तलवार अर्थतज्ज्ञांच्या मते, इंधन टंचाई आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे सरकारने १५ मे पासून दोनदा लिटरमागे ३ रुपयांची दरवाढ केली आहे. या वाढीमुळे मालवाहतूक महाग होऊन येत्या काळात जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला आणि अन्नधान्याचे दर कडाडण्याची शक्यता असून, याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल. दरम्यान, मोठ्या बांधकाम व पायाभूत सुविधा प्रकल्पांना १५० रुपये लिटरने डिझेलचा थेट पुरवठा सुरू असल्याने त्यांचे काम सुरू आहे, परंतु जनता होरपळत आहे.
