महाव्यवस्थापकांनी घेतला मूर्तिजापूर जंक्शनवर प्रवासी सुविधांचा आढावा:शकुंतला रेल्वेचे केंद्र असलेल्या जंक्शनच्या आधुनिकीकरणाला मिळणार गती‎

0
transfar_240_17793750866a0f1bee57a88_junction.jpg



भुसावळ विभागातील ऐतिहासिक व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी गुरुवारी (दि. २१) सदिच्छा भेट दिली. वार्षिक पाहणी दौऱ्याचा भाग म्हणून त्यांनी रेल्वे स्थानकाचे सखोल निरीक्षण केले

.

दौऱ्याच्या सुरुवातीला महाव्यवस्थापकांनी मूर्तिजापूर येथे उभ्या असलेल्या ‘रुद्र- हॉस्पिटल ऑन व्हील्स’ (लाइफलाईन एक्सप्रेस) अंतर्गत आयोजित वैद्यकीय शिबिराला भेट दिली. रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या अत्याधुनिक फिरत्या आरोग्य सेवेची त्यांनी प्रशंसा केली व यंत्रणा अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिले. मूर्तिजापूर हे केवळ एक स्थानक नसून ते अचलपूर आणि यवतमाळला जोडणाऱ्या जुन्या “शकुंतला नॅरोगेज रेल्वे’चे ऐतिहासिक जंक्शन आहे. हे भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या भेटीत महत्त्वाचे निर्णय घेतले. केंद्र सरकारच्या “अमृत भारत’ योजनेंतर्गत मूर्तिजापूर स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे. महाव्यवस्थापकांनी प्लॅटफॉर्म क्रमांक १ व इतर भागांची पाहणी करून सुरू असलेल्या लिफ्ट सुविधा, नवीन पादचारी पूल, डिजिटल सूचना फलक आणि आधुनिक प्रतीक्षागृहाच्या कामांची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या. सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि रेल्वे ट्रॅक दुरुस्तीच्या कामांची त्यांनी तांत्रिक चाचणी घेतली. आरपीएफ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रण व अनधिकृत विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

दर्जेदार सुविधा उभारणार ^मूर्तिजापूर हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार प्रमुख गाड्यांना थांबा देणे आणि स्थानकावरील सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. येथील सुशोभीकरणाचे काम वेळेत पूर्ण होईल. – राजीव श्रीवास्तव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed