आंतरवाली सराटीत प्रसाद लाड – जरांगेंत चर्चा:जरांगेंनी 30 तारखेचे उपोषण मागे घ्यावे – लाड; सरसकट कुणबी प्रमाणपत्र का दिले नाही – जरांगे

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-22t11_1779428996.png




मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आंतरवाली सराटीत सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे व भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यात लाड यांनी जरांगे यांना त्यांचे संभाव्य आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यावर जरांगे कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. प्रसाद लाड म्हणाले, सध्या कडाक्याचे उन पडले आहे. त्यामुळे माझे मनोज जरांगे यांना त्यांचे 30 मेपासून सुरू होणारे उपोषण लांबणीवर टाकण्याचे आवाहन आहे. सरकार आपल्या जागी, मी मराठा समाजातर्फे त्यांना हे आवाहन केले आहे. मी गीतेतला सार घेऊन येथे आलो आहे. मुख्यमंत्री जातीचे नसतानाही त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. हा जरांगे यांचाच विजय आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे कार्यकर्ते आहोत, असे ते म्हणाले. त्यावर जरांगे म्हणाले, आम्ही उपोषणाला बसलो काय पाप केले? सरकारने मराठ्यांना सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र का दिले नाही? सारखी अंतर्गत मराठा विद्यार्थ्यांची संख्या का कमी केली? 80 हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती का थांबवली? मला फक्त माझ्या समाजाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे. आम्हाला बाकी काहीही माहिती नाही. 2004 च्या जीआरनुसार मराठा व कुणबी एकच आहेत. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed