अधार्पूर येथील खून प्रकरणी आरोपी काही तासातच अटकेत; अनैतिक संबंधातून हत्येचा संशय
या प्रकरणी मयताच्या पत्नी दोपदाबाई प्रल्हाद कल्याणकर (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अधार्पूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५३/२०२६ नोंदविला. भारतीय न्याय संहिता (BNS-2023) कलम १०३(१) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून काही तासांतच आरोपीला अटक केली. आरोपी हा देखील त्याच गावातील असल्याची माहिती आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर खून अनैतिक संबंधातून झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. मयत प्रल्हाद राजाराम कल्याणकर यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी, संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक क-हाळे करीत आहेत. या घटनेमुळे कामठा (बु.) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नागरिकांना कायद्याची हाती न घेता घटनेची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. सदर खुनाचा तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपास करण्यात येत आहे.
