राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे ‘डॅमेज कंट्रोल’:खासदार पार्थ पवार – फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट

0
orig_730-x-548-new-2026-05-18t072527353_1779069383.jpg




राष्ट्रवादीमधील संघटनात्मक फेरबदल व नवी पिढी खासदार पार्थ व जय पवारांकडे आर्थिक व प्रशासकीय सूत्रे एकवटल्याने ज्येष्ठ नेत्यांत निर्माण झालेल्या तीव्र नाराजीचा फटका बसू नये यासाठी महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. शनिवारी उशिरा ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री व पार्थ यांच्यात बैठक पार पडली. दरम्यान, या भेटीत काही प्रशासकीय व राजकीय चर्चा झाली. आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळे ही काही फार मोठी बातमी नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. दिव्य मराठी एक्सप्लेनर- नव्या पिढीच्या वर्चस्वामुळे ज्येष्ठ नाराज बारामती पॅटर्नमध्ये जनरेशन गॅप : पटेल व तटकरेंना बाजूला सारून पार्थ व जय पवारांकडे सूत्रे सोपवली जाणे, हा पक्षात असंतोषाचा केंद्रबिंदू आहे. नव्या पिढीच्या वाढत्या वर्चस्वामुळे नाराज ज्येष्ठ नेत्यांची शांतता चिंतेची बाब ठरू शकते. बायपास डिप्लोमसी: पटेल-तटकरे समर्थकांमधील असंतोष व पक्षांतर्गत संघर्षावर सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणे २ ज्येष्ठ नेत्यांनी टाळले, त्याऐवजी महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मध्यस्थीचा मार्ग निवडला आहे. आदिती तटकरेंएेवजी मंत्रिमंडळात शेळकेंना संधी : रोहित पवार काही महिन्यांत मंत्रिमंडळात फेरबदल होणार असून, मंत्री आदिती तटकरेंऐवजी आमदार सुनील शेळके यांना संधी मिळू शकते, असा दावा रोहित पवारांनी केला. यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मला या फेरबदलांची माहिती नाही; कारण विस्ताराचा अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांचाच आहे. तर मित्रपक्षांतील बदलांचे अधिकार सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेंना आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed