निवडणुकांमधील पराभवानंतर आता उद्धवसेना पक्षाची रचना बदलणार:जि. प. गटाऐवजी पं. स. गणस्तरावर विभागप्रमुख

0
new-project-2026-05-17t064101008_1778980317.jpg




शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संघटनेने नव्याने बांधणीला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात पक्षाला मुळापासून बळकट करण्यासाठी आणि सातत्याने होणाऱ्या पराभवाचा दणका रोखण्यासाठी शिवसेना आता तळागाळात नवे संघटनात्मक बदल केले जात आहेत. या नव्या प्रयोगांतर्गत आता पंचायत समिती गणाच्या पातळीवर एक विभागप्रमुख आणि दोन उपविभागप्रमुख नेमले जाणार आहेत. नवी रचना राज्यात प्रथम छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात येत आहे. उद्धवसेनेने महापालिकेत पराभव स्वीकारला. त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांतही पराभवाचा सामना केला. अंबादास दानवे यांनी आमदार झाल्यानंतर संघटनेत अनेक बदल करायला सुरुवात केली आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेतेपदी असताना त्यांनी वरिष्ठ पातळीवरच्या पदाबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबतच्या मागण्या सादर केल्या होत्या. असा होत आहे बदल शिवसेनेत विभागप्रमुख पदापासून सुरुवात होते. जिल्हा परिषद गट पातळीवर हे महत्त्वाचे पद आहे. जिल्हा परिषदेत गटांतर्गत 10 ते 15 गावे येतात. पंचायत समितीमध्ये ही संख्या त्याच्या निम्मी असते. मात्र आता जिल्ह्यात पंचायत समिती पातळीवर गणात एक विभागप्रमुख आणि दोन उपविभागप्रमुख करत आहोत. त्यामुळे 5-6 गावांत मिळून एक विभागप्रमुख, दोन उपविभागप्रमुख येतील. त्यांनीच गावाची जबाबदारी शिवसेनेची सांभाळावी, असे नियोजन आहे. छत्रपती संभाजीनगरात आम्ही याची सुरुवात करत आहोत, असे दानवे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. लोकप्रतिनिधींची मोठी गळती जिल्ह्यात शिवसेनेला सर्वाधिक मोठा फटका आमदारांच्या बंडामुळे बसला. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यातून बहुतांश आमदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत जाणे पसंत केले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी पक्ष सोडून अनेक पदाधिकारी गेले. संभाजीनगरात झालेली ही पक्षाची आतापर्यंतची सर्वात मोठी फूट मानली जाते, त्यामुळे ग्रामीण भागातील गणिते पूर्णपणे बिघडली. संघटना वाढीसाठी बदल पक्षाला लागलेली गळती आणि निवडणुकांमध्ये खालच्या पातळीवर झालेली पीछेहाट पाहता संघटना वाढीसाठी हा नवीन प्रयोग केला जात आहे. विशेष म्हणजे, या नियुक्त्या करताना त्या-त्या भागातील किमान 6 इच्छुकांना स्वतंत्रपणे बोलावण्यात आले आहे. त्यांच्यासोबत सविस्तर बैठका घेऊन, कामाचा आढावा आणि निष्ठा पाहूनच अंतिम नियुक्ती केली जाणार आहे. या नव्या रचनेमुळे तळागाळातील कार्यकर्त्याला बळ मिळेल आणि गटबाजीला लगाम बसेल, असा विश्वास पक्षाला आहे. संसदेतील प्रतिनिधित्व संपले कधीकाळी चंद्रकांत खैरे यांच्या रुपाने सलग २० वर्षे या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकत होता. मात्र, गेल्या दोन निवडणुकांमधील पराभवामुळे शिवसेनेचा या बालेकिल्ल्यातील खासदार संसदेत पोहोचू शकला नाही. खासदारकी गमवावी लागल्याने पक्ष संघटनेला मोठा धक्का बसला असून, ती पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान आता दानवे यांच्यासमोर आहे. त्यातच मनपा आणि जिल्हा परिषदेतही पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed