राष्ट्रवादीत ‘पार्थ’ पर्व, तटकरे,पटेल, भुजबळांना ‘स्थान’ नाही:तरीही तटकरे प्रदेशाध्यक्ष तर प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष!

0
orig_copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-15t174226153_1778980563.jpg



उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षात नव्या- जुन्या पिढीतील संघर्ष तीव्र झाला आहे. खासदार पार्थ पवार यांच्या पुढाकाराने निवडणूक आयोगाला सादर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या मातब्बरांच

.

दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयावर खासदार पार्थ समर्थकांनी पूर्ण नियंत्रण मिळवल्याने नाराज ज्येष्ठ नेत्यांनी थेट शरद पवारांकडे धाव घेत ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून मध्यस्थीची मागणी केल्याची चर्चा आहे. दरम्यान, तटकरे प्रदेशाध्यक्ष, पटेल कार्याध्यक्षपदी कायम असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक व प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले. .

रोहित पवारांचा दावा

तटकरे-पटेल ‘सिल्व्हर ओक’वर : आमदार रोहित पवारांनी दावा केला की, नाराज तटकरे, पटेलांनी शरद पवार यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. बारामती, अजित पवारांच्या राजकीय वारशावर पार्थ यांचा डोळा आहे. ज्यांनी आधी शरद पवारांची साथ सोडली आणि नंतर अजित पवारांनाही डावलले, अशा संधिसाधूंना राष्ट्रीय समितीमधून बाहेर ठेवले जाणे हे योग्यच आहे. हे दोन्ही नेते कुणाचेच सख्खे होऊ शकत नाहीत, असेही ते पटेल आणि तटकरे यांच्याविषयी म्हणाले.

बड्या नेत्याच्या एका ऑडिओ क्लिपमुळेच फेरबदलाचे वारे

सूत्रांनी सांगितले की, २८ जानेवारी रोजी अपघाती निधनापूर्वी काही दिवस आधी अजित पवार आजारी असताना पक्षातील एका बड्या नेत्याने त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याची ऑडिओ क्लिप सुनेत्रा व पार्थ यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर पक्षात मोठे फेरबदल सुरू झाले. केवळ तटकरे-पटेलच नव्हे, तर बहुजन चेहरा असलेले छगन भुजबळ यांनाही बाजूला ठेवण्यात आले. दिल्ली कार्यालयाबाहेर सध्या सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नेमप्लेट्स असल्या, तरी नव्या यादीतील संभ्रमामुळे त्या बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रीय युवा अध्यक्ष धीरज शर्मा यांनी दिल्लीत नवीन पदाधिकाऱ्यांसाठी केबिन उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

आम्ही एनडीएमध्येच, योग्य वेळी भाष्य करू : तटकरे

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. राजकीय पक्षात विविध घडामोडी आणि अंतर्गत प्रश्न निर्माण होत असतात, मात्र चर्चेतून त्यावर नक्कीच मार्ग निघेल. आम्ही एनडीएमध्ये आहोत. – सुनील तटकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed