गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कटिबद्ध रहावे:शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे आवाहन

0
fb27b1f7-b243-4368-bc6d-a994c6c831d3_1779025779565.jpg




अमरावती ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी पोलिसांना गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले आहे. खोलापूर येथील शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक कदम यांनी नुकतीच खोलापूर पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील एकंदरित परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक पोलीस कर्मचारी आणि पोलीस पाटलांची कार्यशाळा घेऊन त्यांनी सद्यस्थितीची माहिती घेतली. या भेटीदरम्यान, कदम यांनी संपूर्ण पोलीस ठाण्याची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर, पोलीस ठाण्याच्या सभागृहात आयोजित पोलीस पाटील व शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. पोलीस आणि शांतता समितीच्या समन्वयातून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. धार्मिक उत्सव सामाजिक सलोखा राखून गुण्यागोविंदाने साजरे करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. आगामी ईदचा सणही शांततेत आणि सामाजिक सलोख्याने साजरा करण्याचे आवाहन कदम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed