[ads1]
नांदेड(प्रतिनिधी)-पत्नीचा छळ करून तिचा खून करणार्या नवर्याला कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
बहाद्दरपुरा येथील रहिवासी ग्यानोबा नागोराव गायकवाड याने 31 मार्च 2021 रोजी दुपारी आपली पत्नी दुर्गाचा गळा दाबून तिचा खून केला आणि घरातील स्लॅबमध्ये पंख्याला तिचे प्रेत लटकवून टाकले आणि तिने स्वतः फाशी घेतल्याचा बनाव तयार केला. परंतू कंधार पोलीस ठाण्यात दुर्गाच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनंंतर हुंडाबळी आणि खून अशा सदरामध्ये कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पुर्ण करून कंधार पोलीसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात एकूण 13 साक्षीदारांनी आपल्या जबाण्या न्यायालयासमक्ष नोंदवल्या. उपलब्ध पुराव्या आधारे कंधार न्यायाधीशांनी ग्यानोबा नागोराव गायकवाडला पत्नी दुर्गाचा खून करण्यासाठी जन्मठेप आणि 5 हजार रुपये रोख दंड तसेच हुंडाबळी यासाठी तिन वर्ष कैद आणि 1 हजार रुपये रोख दंड, पुरावा नष्ट करण्यासाठी 6 वर्ष कैद आणि 2 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठवली आहे. या सर्व शिक्षा ग्यानोबा गायकवाडला एकत्रीत भोगायच्या आहेत.
या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. महेश कागणे यांनी काम पाहिले. कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संजय मुंडे यांनी पैरवी अधिकार्याची भुमिका पुर्ण केली.
Post Views: 248
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad