राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा अपघात:दिलीप धोत्रे यांच्या गाडीला मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर अपघात; रुग्णालयात उपचार सुरू

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-15t12_1778828045.png




मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू दिलीप धोत्रे यांच्या कारला मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. त्यात धोत्रे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पु्ण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, दिलीप धोत्रे हे आपल्या खासगी वाहनाने शुक्रवारी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होते. रस्त्यात समोरून येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात दिलीप धोत्रे यांच्या कारचा पुढचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला. यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात धोत्रे यांनाही मोठा मारला लागला. हा अपघात नेमका का झाला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडली असावी असा दावा केला जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला घेऊन त्यातील जखमींना बाहेर काढले. या घटनेत दिलीप धोत्रे यांच्या छातीला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंशी जवळचे संबंध उल्लेखनीय बाब म्हणजे दिलीप धोत्रे हे मनसेचे सोलापूर जिल्ह्यातील एक मोठे नेते म्हणून ओळखले जातात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या अपघातामुळे मनसेच्या गोटात खळबळ माजली आहे. पंढरपूर येथील त्यांचे समर्थक व मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत. दिलीप धोत्रे हे विद्यार्थी दशेपासूनच राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आहेत. इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या धोत्रेंनी 1992 मध्ये पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद भूषवले. विशेषतः राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून सर्वप्रथम त्यांना साथ दिला. जिल्हा संघटक, शाडो सहकारमंत्री आणि प्रदेश सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांनी नुकतीच पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती. हे ही वाचा… केंद्राने महागाईच्या भडक्यात ‘घासलेट’ टाकले:निवडणुकांचा ‘सेल’ संपला, आता खिसा कापणीचा ‘महासेल’ सुरू, विरोधकांचा घणाघात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत केंद्राने या दरवाढीच्या माध्यमातून महागाईच्या भडक्यात घासलेट टाकल्याची टीका केली आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed