Ashok Kharat SIT Chargesheet; 1200 Pages Filed, 13000+ Links Deleted

0
new-project-2026-05-14t111320285_1778737451.jpg



भोंदू अशोक खरातविरोधात तपासाला गती देत एसआयटीने लैंगिक अत्याचाराच्या दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयात तब्बल 1200 पानी दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणातील पीडितांची बदनामी रोखण्यासाठी सायबर पोलिसांच्या मदतीने आक्षेपार्ह व्हिडिओच्या तब्बल 13,175 लिंक्स आ

.

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या आदेशानुसार, 20 मार्चपासून खरातविरोधातील गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे सोपवला आहे. 24 सदस्यांच्या या विशेष तपास पथकामध्ये 2 पोलीस उपअधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत मिळून एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एसआयटी एकूण 11 गुन्ह्यांचा तपास करत आहे. महिलांवरील अत्याचाराचे 8 आणि फसवणुकीच्या एका गुन्ह्याचा तपास एसआयटीकड आहे. खरातने स्वतःला वाचवण्यासाठी साक्षीदारांवर खोटा खंडणीचा गुन्हा आणि फिर्यादीवर दबाव टाकून आणखी 1 गुन्हा दाखल केला होता; या 2 गुन्ह्यांचा तपासही एसआयटीकडे आहे.

अधिक पुरावे मिळताच पुरवणी आरोपपत्र दाखल करू

नवीन कायद्यातील तरतुदीनुसार महिलांशी संबंधित गुन्ह्यांत गुन्हा दाखल झाल्यापासून 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणे आवश्यक असते. 17 मार्चला दाखल पहिल्या गुन्ह्यासह आतापर्यंत 2 प्रकरणांत नाशिक न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचा तपास थांबलेला नाही; अधिक पुरावे हाती लागताच न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाईल. – तेजस्विनी सातपुते, एसआयटीच्या प्रमुख

सायबर सेलने केली धडक कारवाई

  • 13,175 आक्षेपार्ह लिंक्स हटवल्या.
  • आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 451 अकाऊंट्सवर कायमस्वरूपी बंदी.
  • पीडितांचे व्हिडिओ प्रसारित केल्या प्रकरणी 2 स्वतंत्र गुन्हे दाखल.
  • पथकात उपअधीक्षक अमोल भारती, किरणकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, रवी मांजरे(मुंबई क्राईम बँच) यांचा समावेश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *