सिंहस्थ कुंभमेळा:जागतिक दर्जाच्या आयोजनासाठी 377 एकर जमीन, फडणवीस सरकारचा मास्टरप्लॅन; आखाड्यांना प्रत्येकी 5 कोटी

0
orig_new-project-2026-05-14t062908655_1778720396.jpg




नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी राज्य सरकारने तयारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचे दिमाखदार अनावरण करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक आखाड्याला ५ कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर करत, भव्य आयोजनासाठी सरकारी तिजोरी खुली केली आहे. कुंभमेळ्यासाठी ३७७ एकर जमीन आरक्षित करण्यात आली आहे. साधू-महंतांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले. आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहीत केल्यास त्यांना योग्य मोबदला किंवा पर्यायी जमीन दिली जाईल. तसेच, छोट्या संस्थानांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, कुंभमेळ्याच्या काळातील आखाड्यांच्या वीज देयकाचा भार प्राधिकरणाच्या माध्यमातून शासन उचलणार आहे. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नाही- शिंदे शिंदे यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर कडक भूमिका मांडली. कुंभमेळ्यासाठी ३७७ एकर जमीन आरक्षित करण्यात आली असून गरजेनुसार अतिरिक्त जमीन देण्यास शासन तयार आहे. “सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन जागतिक दर्जाचे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये ६६५ कोटींचा दर्शन पथ कॉरिडॉर भाविकांच्या सुविधेसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भव्य “दर्शन पथ’ कॉरिडॉर उभारला जाणार आहे. ६६५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे ९ हजार भाविक एकावेळी दर्शन घेऊ शकतील. एआय तंत्रज्ञानावर आधारित गर्दी व्यवस्थापन आणि काळ्या पाषाणातील पारंपारिक मराठा शैलीतील हे बांधकाम कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. ५ मिनिटांत आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था यात असेल. बोधचिन्हाचे अनावरण: पुण्याचा सुमीत काटे ठरला “नंबर वन’ या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते कुंभमेळ्याच्या “बोधचिन्हाचे’ अनावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले. देशपातळीवर झालेल्या या स्पर्धेत ३ हजारांहून अधिक स्पर्धकांना मागे टाकत पुणेकर सुमित काटे याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याला ३ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या लोगोमध्ये त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदीचे पवित्र दर्शन घडवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed