महात्मा फुले विद्यापीठाचा बियाणे पॅटर्न; 8 हजार क्विंटलचा टप्पा पार:बियाणे उत्पादनातून बळीराजाची प्रगती हेच आमचे उद्दिष्ट- डॉ. खर्चे
![]()
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बियाणे निर्मितीत मोठी झेप घेतली असून, २०२५-२६ या वर्षात विविध पिकांचे तब्बल ८,४५६ क्विंटल बियाणे तयार करण्याचा विक्रम केला आहे. आगामी वर्षासाठी विद्यापीठाने ८,६३७ क्विंटल बियाणे निर्मितीचे महत्त्वाकांक्षी उ
.
विद्यापीठात कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी ‘बियाणे उत्पादन आढावा बैठक’ पार पडली. या बैठकीच्या उपाध्यक्षपदी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता (कृषि) डॉ. साताप्पा खरबडे व नियंत्रक श्री. सदशिव पाटील, बैठकीचे निमंत्रक प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. नरेंद्र काशीद उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. खर्चे म्हणाले, शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे देणे हे विद्यापीठाचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र, बियाणे वाढवताना जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी जैविक आणि कंपोस्ट खतांचा वापर वाढवण्यावरही आम्ही भर देत आहोत.
या महत्त्वाच्या बैठकीत केवळ बियाणेच नाही, तर आगामी खरीप हंगामावर ‘अल निनो’चा काय परिणाम होईल, यावरही मंथन झाले. कृषिविद्या विभागाचे डॉ. आर. पी. आंधळे यांनी हवामानातील बदलांबाबत सादरीकरण केले. तसेच सोयाबीन, मूग, उडीद, तीळ आणि तूर उत्पादन तंत्रज्ञानावर विविध केंद्रांच्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ. राजेंद्र भिलारे यांनी विद्यापीठांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ऊस बिजोत्पादन त्याचप्रमाणे डॉ. उत्तम कदम, डॉ. आर. टी. गायकवाड, डॉ. भीमराज कांबळे या विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागांतर्गत उत्पादित विविध फळे पिकांच्या रोपांची उपलब्धता, जैविक खते, जैविक औषधे, सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच डॉ. उल्हास गायकवाड यांनी गांडूळ खताचे निर्मितीबाबत माहिती दिली. याप्रसंगी बियाणे विभागाच्या लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी या वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या धुळे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बबनराव इल्हे, कोल्हापूर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र कांबळे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय शेलार, मोहोळ येथील कृषि संशोधन केंद्रातील कृषि सहाय्यक पोळ या अधिकारी व कर्मचार्यांचे सत्कार करण्यात आले. ही आढावा बैठक यशस्वी करण्यासाठी डॉ. कैलास भोईटे, प्रा. बी. टी. शेटे, डॉ. अनिल सूर्यवंशी, डॉ. अविनाश कर्जुले, बी.जी. राठोड, आदिनाथ ढगे, संदीप कोकाटे आदींनी परिश्रम घेतले.
बियाणे विभागाच्या नव्या “लोगो’चे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते बियाणे विभागाच्या अधिकृत ‘लोगो’चे अनावरण करण्यात आले. यासोबतच ऊस बीजोत्पादन, फळपिकांची रोपे, जैविक औषधे आणि गांडूळ खत निर्मितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत या वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या विविध महाविद्यालयांच्या अधिष्ठाता व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
