Nashik-Haryana NEET Paper Leak Network Uncovered
![]()
देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET परीक्षा यंदा मोठ्या वादात सापडली आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. 22 लाख विद्यार्थ्यांनी दिले
.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये बाहेर पडलेली प्रश्नपत्रिका पुढे हरियाणात पोहोचवण्यात आली. हरियाणामध्ये त्या प्रश्नपत्रिकेचे दहा वेगवेगळे सेट तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर हे पेपर बिहार, आंध्र प्रदेश तसेच जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेल्या संस्था, एजन्सी आणि सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेपर लीक होण्याची साखळी इतक्या मोठ्या प्रमाणात कशी कार्यरत होती, याचा शोध आता केंद्रीय तपास यंत्रणा घेत आहेत.
या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तपासात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, जयपूरमधून अटक करण्यात आलेला मनीष नावाचा संशयित या संपूर्ण पेपरफुटीचा सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, प्रश्नपत्रिका अधिकृतरीत्या छापली जाण्यापूर्वीच संभाव्य प्रश्नांची माहिती त्याने मिळवली होती. त्यानंतर संगनमताने प्रश्नपत्रिका बाहेर काढून ती विविध राज्यांमध्ये पोहोचवण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचाही शोध सीबीआय घेत आहे.
दरम्यान, परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम आणि मानसिक तणाव निर्माण झाला आहे. NEET परीक्षेसाठी देशभरातील विद्यार्थ्यांनी वर्षभर कठोर परिश्रम घेतले होते. अनेक विद्यार्थी कोचिंगसाठी आपल्या गावांपासून दूर मोठ्या शहरांमध्ये राहात होते. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर अनेक जण सुटकेचा निश्वास टाकत घरी परतले होते. काही विद्यार्थी कुटुंबासोबत सुट्ट्यांसाठी बाहेर गेले होते. मात्र अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांसमोर पुन्हा तयारी, अभ्यास आणि नव्या तारखेची चिंता उभी राहिली आहे.
परीक्षा केंद्रेच कायम राहतील
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसणार असून, 3 मे रोजी निश्चित करण्यात आलेली परीक्षा केंद्रेच कायम राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे. नव्या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसले तरी विद्यार्थ्यांना नवीन ओळखपत्र दिले जाणार आहे. केंद्र सरकार आणि एनटीएकडून विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
