बालरंग कायर्क्रमात पाच कला सादर करत ५० चिमुकल्यांचे अनोखे फ्यूजन:संगीत, नृत्य, गाणी, तबला वादनासह विविध बालगीते सादर
![]()
प्रतिनिधी | जळगाव स्वानंद कलायत्री व स्वरवेध फाउंडेशनतर्फे १५ वर्षांआतील मुलांचा ‘बालरंग’ कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात शनिवारी पार पडला. त्यात ५० चिमुकल्या कलाकारांनी पाच कला सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात निशा जैन व पंडित संजय पत्की यांनी नटराज पूजन व दीप प्रज्वलनाने केली. त्यानंतर अपूर्वा वाणी, भागवत पाटील, पुष्कराज वाणी यांनी मान्यवरांना गौरवले. कार्यक्रमाची सुरुवात ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ या भूमी पाटीलने गायलेल्या गीताने करण्यात आली. त्यानंतर संगीत, नृत्य, गाणी, तबला वादनासह विविध बालगीते गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन बाल कलाकार अनन्या व कौस्तुभ सहजे यांनी केले.
