राज्यात कायद्याचा वचक राहिला नाही:मुख्यमंत्र्यांनी गृहखाते दुसऱ्याकडे सोपवावे; वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्याची प्रतिमा मलीन- बजरंग सोनवणे

0
new-project-2026-05-10t130842250_1778398776.jpg




राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढले असून, गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मुंबईचा देशात पहिला क्रमांक लागणे ही भूषणावह बाब नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे अनेक खाती ठेवून घेतल्यामुळे गृहखात्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी हे खाते दुसऱ्याकडे सोपवायला हवे होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सरकारवर तोफ डागली. बजरंग सोनवणे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. रुपाली चाकणकर यांची चौकशीसाठी बोलवले आहे तर तसे काही कारण असेल. जर कोणाकडून काही चुका घडल्या असतील तर त्या तपासामध्ये उघड्या होतील, यावर मी काही बोलावे असे मला वाटत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे. राज्यात कायद्याचा वचक नाही बजरंग सोनवणे म्हणाले की, राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मुबईचा पहिला नंबर आला आहे हे काही योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचे आहे. त्यांनी स्वत:कडे अनेक खाते ठेवून घेतले आहेत. मुख्यमंत्री असताना गृहखाते दुसऱ्यांकडे दिले पाहिजे होते. ते दुसऱ्यांकडे खाते का देत नाही? काय माहिती नाही. पण राज्यात कायद्याचा वचक राहिलेला नाही असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. चौकशीतून सर्व काही समोर येईल बजरंग सोनवणे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी अनेक महिलांनी त्यांच्यावर अत्याचार झाला अशा तक्रारी दिल्या आहेत. जवळपास 13 ते 14 तक्रारी झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी प्रकरण उचलून धरत एसआयटी नेमत तपास सुरू केला आहे. या प्रकरणात खरातची पत्नी फरार असून मुलाला सुद्धा अटक झाली. आता या प्रकरणात त्याच्या कुटुंबियांचा सहभाग आहे का नाही हे चौकशीमधून बाहेर येईल. लवांडेंवरील शाईफेक अशोभनीय बजरंग सोनवणे म्हणाले की, विकास लवांडे यांच्यावर जी शाईफेक झाली ती अशोभनीय घटना आहे. साधू संतांच्या या महाराष्ट्रात अशा घटना होणं संयुक्तिक वाटत नाही. विचाराला विचाराने उत्तर दिले पाहिजे, अशा पद्धतीने भ्याड हल्ला करणे चुकीचे आहे. वारकरी संप्रदायाची जी संस्कृती आहे त्याला शोभणारी ही घटना नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed