उबाठाची परंपरा तर दररोज 100 कोटींच्या वसुलीची:राहुल गांधींनी डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसला, मीरा भाईंदरचा जमीन घोटाळा पत्राचाळीसारखाच- नवनाथ बन

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-97_1778305684.jpg




भाजपची परंपरा काय आहे हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये. तुमची परंपरा ही दररोज 100 कोटी रुपये वसुलीची होती, वाझे काय लादेन आहे का हे म्हणायची तुमची परंपरा होती, नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडण्याची, लोकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची उबाठाची परंपरा आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. शुभेंदू अधिकारी यांना भाजपने मुख्यमंत्री केले कारण त्यांच्यावरचे कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. तुमच्यावर आरोप सिद्ध झाले आहेत त्यातून तुम्ही जेलमध्येही गेला हे लक्षात ठेवा. नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीमध्ये फुट पडली हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिष्याची गरज नाही. काँग्रेसने डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसला आणि थलपतींच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांनी अनेक प्रादेशिक पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते उद्या उबाठाच्या सुद्धा पाठीत खंजीर खुपसतील. दोषींवर कारवाई करण्यात येईल नवनाथ बन म्हणाले की, मीरा भाईंदरचा घोटाळा हा पत्राचाळ घोटाळ्या प्रमाणे आहे. ज्या पद्धतीने पत्राचाळ प्रकरणातील आरोपीला सोडले नाही तुम्हाला जेनमध्ये जावे लागले अगदी त्याच पद्धतीने मीरर भाईंदरमध्ये शेतकऱ्यांची जमीन लाटण्याचा जे प्रयत्न करत आहेत चुकीचे काही झाले असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, कोणालाही सोडले जाणार नाही. राऊतांकडून कोर्टाचा अपमान नवनाथ बन म्हणाले की, मीरा भाईंदर जमीनी प्रकरणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की या प्रकरणी राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार आहे. राज्य सरकारची जमीन कोणत्याही बिल्डरच्या धशामध्ये जाऊ दिली जाणार नाही. सरकारच्या वतीने प्रयत्न केले जातील त्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये लढू पण सरकारची एक इंच सुद्धा जमीन बिल्डरच्या धशात जाऊ दिली जाणार नाही. पत्राचाळ सारखेच इथेही आरोपीना जेलमध्ये पाठवले जाईल कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये आपण ही लढाई नक्कीच जिंकू. राऊत ज्या प्रकारे कोर्टाबद्दल बोलत आहे हा कोर्टाचा अपमान आहे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. चिरीमिरी देत निकाल घेतला का? नवनाथ बन म्हणाले की, मेधा सोमय्या यांच्या अपमानाच्या प्रकरणी सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दिलासा दिला. राऊत यांना दिलासा दिला तो योग्य आहे. एखाद्या दुसऱ्या प्रकरणात विरोधात निर्णय दिला तर राऊत कोर्टाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मेधा सोमय्या प्रकरणी राऊतांनी चिरीमिरी देत निकाल घेतला का? हा आमचा सवाल आहे. तुम्ही ढोंगीपणा करतात, असे दुटप्पीपणाचे वागणे योग्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed