सायबर फ्रॉड कॉल सेंटर; 35 खाती:198 सिमकार्ड अन् सहा कोटींचा घोटाळा उघड, चार महिन्यांपासून गोव्यात सेंटर सुरु, नेमणूकीपूर्वी दिले जाते प्रशिक्षण‎



मोर्शी तालुक्यातील काटपूर येथील एका गरजू व्यक्तीला सात हजार रुपये देऊन त्याच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यात आले. त्यानंतर त्याच गावातील आणखी सात जणांची बँक खाती उघडून घेण्यात आली. ही खाती उघडून घेणारा व्यक्ती अमरावती येथील राकेशकुमार झामण

.

दरम्यान याच गुन्ह्याच्या तपासात ग्रामीण पोलिसांच्या सायबर पथकाने थेट गोवा गाठत तेथे अनधिकृतरीत्या सुरू असलेले सायबर फसवणुकीचे कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. तपासादरम्यान या कॉल सेंटरवर काम करणाऱ्या व्यक्तींना कामापूर्वी सायबर फसवणुकीचे विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. मागील चार महिन्यांपासून गोव्यातील विविध ठिकाणी हे कॉल सेंटर सुरू असल्याचेही तपासातून निष्पन्न झाले आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये राकेशकुमार झामणानी काटपूर येथे गेला होता. त्याने गावातील काही नागरिकांची बँक खाती उघडून घेतली. त्याबदल्यात त्यांना किरकोळ रक्कम देण्यात आली. मात्र संबंधित खात्यांचे पासबुक, एटीएम कार्ड तसेच बँकेत नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकांचे सिमकार्ड त्याने स्वतःच्या ताब्यात घेतले. एकूण ३५ नागरिकांची बँक खाती उघडून घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. उर्वरित,पान.४ मिळालेल्या पैशांची आर्थिक उलाढाल करुन रक्कम जमा या प्रकरणी पोलिसांनी आवाहन केल्यानंतर आणखी काही नागरिक पुढे आले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील अनेक व्यक्तींची बँक खाती या टोळीमार्फत उघडून घेण्यात आल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नागरिकांची सायबर फसवणूक करून मिळालेल्या पैशांची आर्थिक उलाढाल करण्यासाठी केला जात होता.आतापर्यंत पोलिसांनी ६४ खात्यांमधून ६.२६ कोटी रुपयांचे आर्थीक व्यवहार या कॉल सेंटरच्या माध्यमातून झाल्याचे समोर आणले आहे.

दुसऱ्याचे व्हॉट्सॲप वापरुन सर्वांना कॉल केले जायचे या टोळीतील सदस्य एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी प्रामुख्याने व्हॉट्सॲप कॉलचा वापर करीत होते. विशेष म्हणजे वापरले जाणारे व्हॉट्सॲप क्रमांकही इतरांच्या नावावर असत. कारण बँक खाते उघडल्यानंतर त्या खात्याशी संबंधित सिमकार्ड आणि संपूर्ण ॲक्सेस आरोपी स्वतःकडे ठेवत होते. त्यामुळे कोणत्याही क्रमांकावरून व्हॉट्सॲप सुरू करून त्याचा वापर करणे त्यांना शक्य होत होते. क्रमांक इतरांच्या नावावर असल्याने पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणे कठीण होते.

आंतरराष्ट्रीय लिंकचा तपास सुरू; मोठे मासे गळाला या सायबर गुन्हेगारांनी देशभरातील अनेक नागरिकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची रक्कम उकळल्याचा संशय आहे. या रकमेपैकी मोठा हिस्सा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठविण्यात आला असण्याची शक्यता आहे. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ही रक्कम परदेशात हस्तांतरित झाली आहे का आणि त्यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कदम यांनी दिली.

सर्व सुविधा मोफत आणि वेळेत उपलब्ध करून दिल्या दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत बारा आरोपींकडून ६४ पासबूक, १४७ एटीएम कार्ड, १९ चेकबुक, १९८ सिमकार्ड, ५२ मोबाईल हँडसेट, ९ लॅपटॉप आणि ३ टॅबलेट जप्त करण्यात आले आहेत, ज्यांची एकूण किंमत १० लाख ८५ हजार रुपये आहे. या कॉल सेंटरवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दरमहा २५ ते ३० हजार रुपये वेतन दिले जात होते. याशिवाय इतर सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जात होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *