![]()
मुंबई, नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यात हजेरी; यवतमाळमध्ये 3 ठार
जवळपास १५ दिवस अडकलेला मान्सून मंगळवारी मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात दाखल झाला. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मान्सून बरसला. केवळ २४ तासांत राज्याचा सुमारे ७५ टक्के भाग या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी व्यापला आला आहे. मंगळव
.
१- २ दिवसात उर्वरित महाराष्ट्रात पोहोचेल मान्सून
सध्या उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे, उर्वरीत महाराष्ट्रही एक-दोन दिवसात मान्सूनने व्यापला जाईल, यंदा पावसात खंड राहतील, हवामान बदलामुळे नुकताच झालेला पावसाचा खंड आता निघुन गेला आहे. सध्या ५ ते ६ जूनपर्यंत राज्यात पाऊस राहील अशी स्थिती आहे. या काळात कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक राहील. तेथे ४० ते ६० मिमी पाऊस राहील. – डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ.
संभाजीनगरच्या सिल्लोडमधील भराडी नदीला पूर
- हवामान खात्याने बुधवारी राज्यातील एकूण ३० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला.
- कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी.
- पुढील चार दिवसांसाठी नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली आणि मराठवाड्यात वीजेचा कडकडाट, वादळी वाऱ्याचा अंदाज.
