पर्यावरण रक्षणाचा ध्यास:निर्माल्यातून सेंद्रिय खत, वृक्षलागवड, संवर्धन करणार, ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचा उपक्रम
![]()
निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करून ते वृक्षलागवड, संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षणासाठीचा हा उपक्रम ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पातर्फे राबवण्यात येणार असून, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी १० मेपासून सुरू होणार आहे. सध्या पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून वृक्षांची कत्तल दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमींकडून वृक्षारोपण, संगोपनासाठी वर्षभर उपक्रम राबवण्यात येतात. मात्र या वृक्षांचे व्यवस्थित संगोपन होत नाही. परिणामी वृक्षारोपण मोहिमेचा फायदाच होत नाही. वृक्षांना सेंद्रिय खत मिळत नसल्यानेही वाढ होत नाही. नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी एक नाविन्यपूर्ण आणि दूरदृष्टीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. “अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प”च्या वतीने पुढील पाच वर्षांसाठी वृक्षलागवड, संगोपन व संवर्धनासोबतच निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मितीची योजना जाहीर करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, महाराष्ट्रात अशा प्रकारची एकत्रित पर्यावरणपूरक योजना राबवण्यासाठी अकोला पुढाकार घेत आहे. हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असा दावा आयोजकांनी केला आहे. महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात अकोला आघाडीवर येत आहे. हा ५ वर्षांचा प्रकल्प शहराला अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही बनवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल मानला जात आहे. योजनेत सहभाग होण्यासाठी इच्छुकांना पुष्कर अपार्टमेंट, सातव चौक येथील प्रकल्प कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांना पावसाळ्यात मोफत वृक्षरोपे दिली जाणार आहेत. निर्माल्य (पूजेनंतर उरलेली फुले व जैविक सामग्री) संकलित करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. हे खत वृक्षांना दिले जाणार आहे. प्रकल्पाच्या वतीने तयार करण्यात आलेले हे सेंद्रिय खत सहभागी नागरिकांना टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रकल्पाचे प्रमुख नीलेश देव यांचे म्हणणे आहे. नोंदणी केल्यास रोप व खत
