आठवडाभरात तापमान 2.7 अंश सेल्सियसने घटले:अकाेला @ 42.2; सोमवारपर्यंत कोरडे वातावरण
![]()
जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा भडका उडलेला असताच मे महिन्यात मात्र एकाच आठवड्यातच पारा २.२७ अंश सेल्सिअस कमी झाला. मंगळवार २८ एप्रिल रोजी ४५.२ अंश सेल्सिअस असलेला पारा मंगळवार ५ मे रोजी मात्र ४२. ५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. तसेच ११ मेपर्यंत वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाजही मंगळवारी हवामान विभागाने वर्तवला. गतवर्षी खरीप नंतर रब्बीमध्येही अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कमी जाणवेल, असा सामन्यांचा अंदाज होता. मात्र . मार्चमध्येच प्रचंड तापले. २ मार्च रोजी तर अकोल्यात भारतात सर्वाधिक ३८.५ सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. त्यानंतर आता एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात पारा ४६.९पर्यंत पारा पोहोचला सर्वोच्च तापमानामुळे अकोल्यात रविवारी दुपारी उन्हाचे चटके लागत होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे हातपाय भाजल्यासारखे जाणवत होते. डोक्याला दुपट्टा बांधूनही उन्हापासून संरक्षण होत नसल्याचे जाणवत होते. उन्हाची तीव्रता दुपारनंतर प्रचंड वाढल्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसून आले. कामासाठी घराबाहेर पडलेले नागरिक झाडांची सावली शोधत होते. आता तुलनेने कमी ऊन असून, अकोलेकरांना अल्पसा का होईना दिलासा मिळाला आहे. तारीख तापमान २८ एप्रिल ४५.२ २९ एप्रिल ४४.२ ३० एप्रिल ४३.६ १ मे ४२.९ २ मे ४३.९ ३ मे ४३.५ ४ मे ४३.२ ५ मे ४२.५ असे झाले तापमान कमी
