हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ!:23 वर्षीय विवाहितेचा करुण अंत, सुसाइड नोट पोलिसांच्या हाती; आरोपींना अटक

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-06t182046845_1778071886.jpg




अहिल्यानगरच्या राहतामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे. विहिरीत उडी मारून या विवाहितेने आपले जीवन संपवले. राहता तालुक्यातील एकरुखे इथे ही घटना घडली. प्रिया शुभम ढगे (वय 23) असे मृत महिलेचे नाव आहे. घरच्या बांधकामासाठी चार लाख रुपयांची मागणीसाठी विवाहितेचा छळ सुरू होता. या प्रकरणी पती शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे यांच्यावर राहता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2024 ते 2026 या कालावधीत विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. हा छळ अखेर सहन न झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुसाइड नोट पोलिसांच्या हाती दरम्यान, मृत प्रिया यांनी मृत्यूपूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. ही नोट पोलिसांच्या हाती लागली असून तिने सासरच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. यात असे लिहिले आहे की, सगळे काही सासूमुळे झाले आहे. नवऱ्याने माझ्यावर कधीच प्रेम केले नाही. ताई तुम्ही माझ्यासाठी खूप केले, पण आता मला काहीच नको. मी खूप सहन केले आहे. मला माझी श्रेया माझ्या जवळ नाही. तिला खूप मिस करते पण ती माझ्याकडे येणार नाही. माझा नवरा शुभम, मी त्याच्यावर खूप प्रेम केले, पण त्याने कधीच माझ्यावर प्रेम केले नाही. त्याचे प्रेम फक्त त्याच्या कुटुंबावर होते. ताई, श्रेयाची काळजी घे. श्रेयाला मी तुझ्यावर सोपवून जात आहे. आज महिना झाला तिला पाहिले नाही. खूप मिस करते श्रेयाला. माझ्या श्रेयाचा सांभाळ कर ताई.. पुढे असे लिहिले आहे की, सॉरी श्रेया.. तुझ्यासाठी मी काहीच करू शकले नाही. आज सगळे बोलत आहेत की मी चुकी केली आहे, पण मी चोरी केली नाही. अक्काचे पैसेही नाही घेतले. मला नोकरी करायची होती, पण घरचे नाही बोलले. फक्त आता कोणालाही टेंशन नाही द्यायचे. तसेच पुढे लिहिले आहे की, शुभमला सांगा, करा मजा आता मी तुमच्या लाइफमधून गेले आहे. माझी शेवटची एकाच इच्छा आहे, माझ्या श्रेयाचा सांभाळ कर ताई. आता मला काहीच नको आहे. सॉरी.. लव्ह यू श्रेया..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed