राऊतांनी पाकिस्तानात जावून निवडणूक लढवावी:ममता-स्टॅलिन घरी गेले, 'इंडिया' आघाडीत आता फक्त काँग्रेसच शिल्लक- नवनाथ बन

0
new-project-2026-04-28t115726138_1777965896.jpg




पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापले असून भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी ‘इंडिया’ आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आघाडीला बाजूला सारून निवडणूक लढवली, मात्र या निकालांनी आघाडीचे अस्तित्वच धोक्यात आणल्याचे त्यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टॅलिन हे उद्धव ठाकरेंचे जवळचे मित्र होते. मात्र, जनतेने या दोघांनाही घरी पाठवले आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आघाडीला महत्त्व न देता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, ज्यामुळे आता त्या आघाडीत कुणीही उरलेले नाही. नवनाथ बन म्हणाले की, या आघाडीत आता केवळ काँग्रेस उरली आहे. मात्र, काँग्रेसचे स्वतःचे भवितव्य काय आहे, हे राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक आहे. विरोधक कितीही एकत्र येण्याचा प्रयत्न करत असले, तरी जमिनीवर त्यांचे अस्तित्व संपत चालले आहे. राऊतांनी पाकिस्तानात जावे नवनाथ बन म्हणाले की, इंडिया आघाडीला देशात तर उबाठाला महाराष्ट्रात निवडणूक जिंकणे अवघड दिसत आहे. संजय राऊत यांना पुन्हा महाराष्ट्रातून राज्यसभेवर संधी मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे राऊतांनी पाकिस्तानमध्ये जात खासदारकीची निवडणूक लढवावी.कारण त्यांची तिथे चांगली चालते. ते त्यांचा उदोउदो करतात. ठाकरे, राऊत यांनी पाकिस्तानमध्ये पक्ष वाढवावा, आणि भारताचे नागरिकत्व सोडावे. राउतांमुळे अवस्था वाईट नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी एक अश्वकोश निर्माण केला पाहिजे. संजय राऊत जी भाषा वापरतात त्यासाठी शब्दकोश ही तर अश्वकोश लागेल. कारण त्यांच्या बोलण्यामुळे उबाठा गटाला अश्व लागले आहेत. त्यांच्या पक्षाची अवस्था वाईट झाली आहे. त्या अश्चकोशाचे प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते करावे, जेणेकरून त्यांच्या पक्षाची अधोगती का झाली हे महाराष्ट्राला समजेल. निवडणूक हरले की राऊत काय काय शब्द शोधून काढतात. त्यांच्या पक्षाला अश्च कसे लागले हे यातून कळते. ..तर राऊतांना मिर्च्या झोंबतात नवनाथ बन म्हणाले की, पश्चिम बंगाल, आसाममध्ये भाजप जिंकले तर लोकशाहीसाठी घातक आहे. आणि केरळमध्ये काँग्रेस जिंकले तर लोकशाहीचा विजय असतो, तामिळनाडूमध्ये विरोधक जिंकले तर तिथे लोकशाहीचा विजय असतो. अन् भाजप जिंकले तर राऊतांना मिर्च्या झोंबतात. निवडणूक या पापात सहभागी नाहीत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जी दादागिरी केली, जे पाप केले ते धुण्याचे काम जनतेने केले आहे. तिथे अनेक वर्षे दीदीच्या गुंडानी महिलावर अत्याचार केले ते पाप धुण्याचे काम जनतेने केले. उद्धव ठाकरेंचे अडीच वर्षांचे पाप धुण्याचे काम एकनाथ शिंदेंनी केले. मग देवाभाऊंचे राज्य आले. काँग्रेस जिंकली की विजय, भाजप जिंकली की संशय नवनाथ बन म्हणाले की, तामिळनाडू, केरळमध्ये एसआयआर झाले तिथे विरोधक जिंकले. आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकली तर तुम्हाला इतक्या मिर्च्या का लागत आहेत. निवडणूक आयोग, एसआयआा केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये काम करत होते पण तुमचा विजय झाला त्यावर तुम्ही आक्षेप घेत नाही. पण भाजपला जनतेने निवडून दिले की तुम्हाला मिर्च्या झोंबतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *