Atul Save OSD Vijay Karande Attempted Murder Wife Son Assault Pune
![]()
पुण्यातील हायप्रोफाईल क्वीन्स गार्डन परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मंत्री अतुल सावे यांचे माजी ओएसडी विजय कारंडे यांनी आपल्या पत्नीवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला करत तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. या पाशवी हल्ल्यात त्यांनी आपल्या लहा
.
मिळालेली माहिती अशी की, ३० एप्रिल रोजी सायंकाळी विजय कारंडे यांच्या क्वीन्स गार्डन येथील निवासस्थानी हा प्रकार घडला. विजय कारंडे यांच्या पत्नीने त्यांच्या मोबाईलमधील काही संशयास्पद चॅट पाहिले आणि त्याबाबत विचारणा करत मोबाईलचा पासवर्ड मागितला. या क्षुल्लक कारणावरून कारंडे यांचा संयम सुटला आणि त्यांनी पत्नीला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर काही वेळातच भीषण हाणामारीत झाले. कारंडे यांनी घरातील क्रिकेटची बॅट उचलून पत्नीला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी पत्नीचा गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वडिलांचा हा अवतार पाहून त्यांचा मुलगा आईला वाचवण्यासाठी मध्ये पडला, मात्र आरोपीने पोटच्या मुलावरही दया दाखवली नाही आणि त्यालाही बॅटने मारहाण करत गंभीर दुखापत केली.
पत्नीची पोलिसांत धाव
या जीवघेण्या हल्ल्यानंतर विजय कारंडे यांची पत्नी आणि मुलगा दोघांनीही स्वतःचा जीव वाचवत घर सोडले आणि थेट पोलिस स्टेशन गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विजय कारंडे यांच्यावर खुनाचा प्रयत्न (IPC ३०७), जाणीवपूर्वक दुखापत करणे आणि धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहेत विजय कारंडे?
विजय कारंडे हे मूळचे नांदेड येथील समाजकल्याण विभागात कार्यरत आहेत. सध्या ते मुंबईत मंत्रालयात ओबीसी कल्याण, दुग्धविकास आणि ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्याकडे ‘विशेष कर्तव्य अधिकारी’ (OSD) म्हणून प्रतिनियुक्तीवर काम करत होते. अतुल सावे यांच्या कार्यालयातून माहिती घेतली असता कारंडे यांनी 15 दिवसांपूर्वीच कौटुंबिक कारणास्तव काम सोडले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या घटनेनंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा…
नसरापूर प्रकरणात निर्घृणतेची परिसीमा:चिमुरडीच्या मृत्यूमागील भीषण वास्तव समोर; पोस्टमार्टम रिपोर्टमधून गंभीर बाबी उघड
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणात शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या अहवालात नमूद झालेल्या निरीक्षणांमुळे घटनेचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले असून, या प्रकरणातील क्रौर्य स्पष्ट होते. ससून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे अहवाल सादर केल्यानंतर या घटनेबाबत पुन्हा संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच या प्रकरणामुळे राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणा टीकेच्या केंद्रस्थानी असताना, या नव्या तपशीलांमुळे वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सविस्तर वाचा…
