आलापूरवाडीत विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू:शिऊर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

0
240_177782227569f76a43b874d_111.jpg




प्रतिनिधी | शिऊर वैजापूर तालुक्यातील आलापुरवाडी येथे विहिरीत पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. ३) मे रोजी दुपारी घडली. या प्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे नाव आण्णासाहेब ताराचंद पगारे (वय ४०, रा. आलापुरवाडी) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास आलापुरवाडी शेतगट क्रमांक १६२२ येथील विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांचे भाऊ काकासाहेब ताराचंद पगारे यांनी त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर येथे बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. अण्णासाहेब यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. दरम्यान, सायंकाळी ५.५० वाजता शिऊर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed