जिल्ह्यात आजपासून एका ‘क्लिक’वर होणार ‘स्व-गणना’:जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या माहितीचा डेटा प्रशासनाकडून थेट ‘टॅब’मध्ये केला जाणार जमा‎

0
253_177756328969f3769968c8b_census.jpg



अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवार, १ मे पासून प्रथमच कागद आणि पेन विरहित ‘डिजिटल जनगणने’चा पहिला टप्पा सुरू होत आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या या महाप्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, हायटेक पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे.

.

कोविड-१९ मुळे लांबणीवर पडलेली ही प्रक्रिया आता २०२६-२७ साठी नियोजित करण्यात आली आहे. या जनगणनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, नागरिकांना आता प्रगणकाची वाट न पाहता घरबसल्या स्वतःची माहिती स्वतः भरता येणार आहे. १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांनी https://se.census.go v.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ३३ प्रश्नांची उत्तरे मराठीतून भरायची आहेत. यात घराची स्थिती, कुटुंबाची माहिती आणि उपलब्ध सोयी-सुविधांचा समावेश असेल. ही माहिती यशस्वीरीत्या भरल्यानंतर नागरिकांना मोबाईलवर तसा संदेशही प्राप्त होईल.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्र वगळून अन्य तालुक्यांमध्ये ही प्रक्रिया आजपासून सुरू होईल. स्व-गणनेचा हा कालावधी संपल्यानंतर १६ मे ते १४ जून या काळात प्रगणक घराघरांत पोहोचतील. नागरिकांनी भरलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी प्रगणकांच्या हाती यावेळी कागदी फॉर्मऐवजी अत्याधुनिक ‘टॅब’ आणि मोबाईल ॲप असेल, ज्यामुळे माहिती रिअल-टाइम अपडेट होऊन कागदाचे गठ्ठे इतिहासजमा होणार आहेत. घटक २०११ ची जनगणना २०२६ ची जनगणना माध्यम कागद, पेन आणि गठ्ठे पूर्णपणे पेपरलेस (टॅब/ॲप) प्रश्नांची संख्या २९ प्रश्न ३३ प्रश्न नोंदणी पद्धत केवळ कर्मचारी घरी आल्यावर नागरिक स्वतः करू शकतात ( स्व-गणना) लोकसंख्या ४५ लाख ५५ लाखांहून अधिक (अंदाजे) निष्कर्ष वेळ २ ते ३ वर्षे १ ते १.५ वर्षे लवकर अपेक्षित Share with facebook { मुख्याधिकारी: १५

वेळ आणि पैशांची मोठी बचत डिजिटल जनगणनेमुळे डाटा एन्ट्रीसाठी लागणारा हजारो कर्मचाऱ्यांचा वेळ १०० टक्के वाचणार आहे. २०११ मध्ये माहिती गोळा करून ती राज्याला पाठवण्यात आणि मॅन्युअल एन्ट्री करण्यात अनेक महिने जायचे. आता माहिती थेट सर्व्हरवर अपलोड होणार असल्याने निष्कर्ष लवकर जाहीर होतील. याशिवाय कागद खरेदी आणि छपाईवर होणारा कोट्यवधींचा खर्च पूर्णपणे वाचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed