प्रताप गायकवाड हत्या प्रकरण; सहा नव्या आरोपींना अटक ;आठ जणांना २ मे  पर्यंत पोलीस कोठडी  

0
IMG-20260429-WA0033.jpg


नांदेड (प्रतिनिधी) –  शहरातील पूर्णा रोडवरील नदी परिसरात घडलेल्या प्रताप दत्ता गायकवाड (वय 26) हत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी सहा आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने अटक केलेल्या सहा  आरोपींपैकी पाच जणांना 2 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल 2026 रोजी केशव दत्ता गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा प्रताप गायकवाड याची पैशांच्या देण्याघेण्याच्या वादातून हत्या करण्यात आली. विजय वायवळ, सुरज सदाशिव  बुक्तरे  आणि अनिकेत उर्फ सोनू बुक्तरे  या आरोपींनी संगनमत करून प्रताप गायकवाड याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक 230/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 103, 351(3) तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुरुवातीला विजय रुखमण वायवाळ, सुरज सदाशिव  बुक्तरे  व अनिकेत उर्फ सोनू सदाशिव  बुक्तरे  या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना आज 29 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

दरम्यान तपासादरम्यान इतर आरोपींचा सहभाग उघडकीस आल्याने पोलिसांनी गोरखनाथ गोविंदराव तागडे (वय 36), संकेत गोरखनाथ दुथडे (वय 25), सारंग नारायण कोयाळकर (वय 55), रामदास उर्फ स्वराज ज्ञानोबा कांबळे (वय 25), सुरज संभाजी बादवड (वय 19) व ओमकार पांडुरंग वंजारे (वय 25) यांना अटक केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. जी. महाजन व पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या पथकाने सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले. सरकारी वकील शेख सादिक यांनी आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत न्यायालयाने 9 आरोपींपैकी 8 जणांना 2 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातमी ….

प्रताप गायकवाडचा खून करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

संबंधित व्हीडीओ ….


Post Views: 650






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed